ट्रम्प चीन दौऱ्यावर;विविध मुद्द्यांवर जिनपिंगशी करणार चर्चा

ट्रम्प चीन दौऱ्यावर;विविध मुद्द्यांवर जिनपिंगशी करणार चर्चा

डॉनाल्ड ट्रम्प यांचं चीनमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं.या सोहळ्यात दोन्ही देशांची राष्ट्रगीत गायली गेली. तसंच दोन्ही राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी या सोहळ्यात उपस्थित होत्या

  • Share this:

09 नोव्हेंबर: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांचं बीजिंगच्या ग्रेट हॉल ऑफ पीपलमध्ये शाही स्वागत झालं. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग सोहळ्याला उपस्थित होते. आज अनेक अंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्च होणार आहे.

डॉनाल्ड ट्रम्प यांचं चीनमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं.या सोहळ्यात दोन्ही देशांची राष्ट्रगीत गायली गेली. तसंच दोन्ही राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी या सोहळ्यात उपस्थित होत्या. आज जशी दिवसाची सुरूवात जंगी सोहळ्याने झाली तसाच दिवसाचा शेवटही शाही भोजनाने होणार आहे.

आज दोघांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. अमेरिका आणि चीनच्या बड्या उद्योजकांमध्येही चर्चा होणार आहे. दोन्ही देशांच्या कंपन्यांमध्ये काल 9 अब्ज डॉलर्सचे करार झाले. चीन आणि अमेरिका तसे एकमेकांचे कट्टर विरोधक देश. दोघांच्या विचारसरणीतही मुलभूत फरक. पण याचा परिणाम दोन्ही देशांनी व्यापारावर होऊ दिला नाही. पण राजकीय मतभेत बरेच आहे. उत्तर कोरियाचं काय करायचं, याबाबतही दोघांच्या दृष्टीकोनात फरक आहे. तसंच, रशियाला शह देण्यासाठीही चीन आपल्या बाजूनं असणं अमेरिकेसाठी गरजेचं आहे. या सगळ्या मुद्द्यांवर ट्रम्प आणि जिनपिंगमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे.

First published: November 9, 2017, 10:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading