मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्यांच्या स्वप्नांना धक्का; ट्रम्प लवकरच करणार ही नवी घोषणा

अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्यांच्या स्वप्नांना धक्का; ट्रम्प लवकरच करणार ही नवी घोषणा

अमेरिकेत जायचं स्वप्न बघत असणाऱ्यांना मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकार अमेरिकेचे (US VISA) नियम बदलण्याच्या तयारीत आहे.

अमेरिकेत जायचं स्वप्न बघत असणाऱ्यांना मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकार अमेरिकेचे (US VISA) नियम बदलण्याच्या तयारीत आहे.

अमेरिकेत जायचं स्वप्न बघत असणाऱ्यांना मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकार अमेरिकेचे (US VISA) नियम बदलण्याच्या तयारीत आहे.

वॉशिंग्टन, 22 जून : अमेरिकेत जायचं स्वप्न बघत असणाऱ्यांना मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सरकार अमेरिकेचे VISA नियम बदलण्याच्या तयारीत आहे. व्हिसा नियमात नवे निर्बंध लागू होऊ शकतात. त्याची घोषणा ट्रम्प लवकरच करतील, असं तिथल्या माध्यमांनी म्हटलं आहे. अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांना अमेरिकेच्या व्हिसा नियमात बदल झाल्याने मोठा फटका बसू शकतो. विशेषतः H1B VISA घेऊन अमेरिकेत नोकरीसाठी जाणाऱ्यांचं नुकसान होऊ शकतं. या प्रकारच्या व्हिसाचं प्रमाण कमी करण्याचा अमेरिकेने निर्णय घेतला आहे. डोनल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत व्हिसा निर्बंधांनी लवकरच घोषणा करणार असल्याचं जाहीर केलं. अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या अडीच लाख लोकांना याचा फटका बसू शकतो. सध्या अमेरिकेत असणाऱ्या भारतीयांना मात्र या नवीन नियमांमुळे फारसा फरक पडणार नाही. महाराष्ट्रातून अनेक आयटी प्रोफेशनल H-1B व्हिसा घेऊन अमेरिकेत जातात आणि बहुतांश थोड्या कालावधीसाठी जाणारे L-1 म्हणजे कंपनीतर्फे व्हिसा मिळवून अमेरिका वारी करतात. या दोन्ही प्रकारच्या व्हिसा नियमांत बदल होऊ शकतो. दोन महिन्यात 2.21 कोटी लोकांनी गमावल्या नोकऱ्या; तरी ट्रम्प का आहेत बिनधास्त? अमेरिकेत मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाव्हायरस (Coronavirus) रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केला. परिणामी या दोन महिन्यात तब्बल 2.21 कोटी लोकांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या. एप्रिल महिन्यात देशातील बेरोजगारीचा दर 14.7 होता. अमेरिकेत 1948नंतर पहिल्यांदाच इतकी वाईट परिस्थिती आहे. मे महिन्यात बेरोजगारीचा दर 13.3 टक्क्यांनी घसरला, तर या महिन्यात 25 लाख लोकांनी नोकर्‍या गमावल्या. अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक जवळ आली आहे. त्याकरता दोन्ही प्रमुख पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. बेरोजगारीचा वाढता दर आणि स्थानिकांना रोजगारात प्राधान्य हा ट्रम्प सरकारचा जिव्हाळ्याचा विषय असल्याचे ते सांगत आले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर अमेरिकन मतदारांना भुरळ घालायला परदेशातून नोकरीसाठी अमेरिकेत येणाऱ्या भारतीयांवर निर्बंध आणण्याची घोषणा होऊ शकते. स्थानिकांच्या नोकऱ्या आशियायी कर्मचारी पळवतात, असा अमेरिकेतल्या मोठ्या लोकसंख्येत मतप्रवाह आहे. या समाजाला चुचकारण्यासाठी व्हिसा नियमात बदल यासारख्या घोषणा ट्रम्प करू शकतात. संकलन - अरुंधती चिनी कंपन्यांसोबत 5000 कोटींच्या करारावर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
First published:

Tags: Donald Trump, H1 B Visa

पुढील बातम्या