डोनाल्ड ट्रम्प यांची सटकली; म्हणाले, 'आम्ही तुम्हाला उध्वस्त करू'

डोनाल्ड ट्रम्प यांची सटकली; म्हणाले, 'आम्ही तुम्हाला उध्वस्त करू'

वादग्रस्त निर्णय आणि वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य केले आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 08 ऑक्टोबर: वादग्रस्त निर्णय आणि वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांनी यावेळी थेट धमकीच दिली आहे. ट्रम्प यांनी तुर्कस्तानला धमकी दिली आहे. तुर्कीने जर सीरियाप्रकरणी मर्यादांचे उल्लघन गेले तर तुमची अर्थव्यवस्था नष्ट करेन. याआधी ट्रम्प यांनी तुर्कीच्या सीमेवरून अमेरिकेचे सैन्य हटवले होते. तुर्कीमधील सध्याच्या परिस्थितीचा सामना त्यांनाच करावा लागेल असे ट्रम्प यांनी म्हटले होते.

तुर्कस्तानाला धमकी देताना ट्रम्प यांनी एक ट्विट केले आहे. ते म्हणतात, मी याआधीही स्पष्ट केले आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की तुर्कीने असे काही केले जे माझ्या दृष्टीने मर्यादांचे उल्लंघन ठरणारे असेल तर मी अर्थव्यवस्था नष्ट करून टाकेन. अर्थात याआधी त्यांनी तुर्कीला स्वत:च्या परिस्थितीचा स्वत: मुकाबला करण्यास सांगितले. तुर्की, युरोप, सीरिया, इराण, इराक, रशिया आणि कुर्द या सर्वांना स्वत: त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे. या सर्वांना त्यांच्या क्षेत्रात सापडलेले आयएसच्या दहशतवाद्यांसोबत काय करायचे तो त्यांचा निर्णय आहे. या परिसरात होणारे युद्ध हो अधिकतर टोळी युद्ध आहेत आणि त्याचा काही शेवट नाही. त्यामुळेच वेळ आली आहे की आता आमच्या सैनिकांना घरी बोलवण्याची. अमेरिका स्वत:च्या हितासाठीच लढेल आणि ती लढाई जिंकण्यासाठीच असेल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

कुर्द लोकांवर हल्ला करण्यासाठी तुर्की उत्तर सीरियाच्या दिशेकडे सरकत आहे. पण या लढाईत अमेरिकेचे सैन्य त्यांच्यासोबत असणार नाहीत. तुर्कीच्या सीमेवरून अमेरिकेचे सैन्य हटवण्यात आले आहे. आता तेथे फक्त कुर्द आहेत. ज्यांनी ISISच्या विरुद्ध अमेरिकेची साथ दिली होती. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुर्कीकडून कुर्दांवर हल्ला होऊ शकते पण त्यात अमेरिका त्यांच्या सोबत नसेल.

सीरियाच्या उत्तर सीमेवरून अमेरिकेचे लष्कर हटवण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयावर अनेकांनी टीका केली आहे. ट्रम्प यांच्यामते अमेरिकेला जितक शक्य होईल तितक काम केले आहे आणि वेळ आली आहे अन्य लोकांनी स्वत:ची जबाबदारी पार पाडण्याची.

काय आहे तुर्क विरुद्ध कुर्द संघर्ष

कुर्द लोकांनी ISISविरुद्धच्या दहशतवाद्यांविरुद्ध अमेरिकेची मदत केली होती. पण तुर्की त्यांना दहशतवादी असल्याचे मानतात. तुर्कीत असलेल्या दहशतवादी संघटनांना कुर्दांची मदत असते. यामुळेच कुर्द लोकांविरुद्ध तुर्कीने युद्धाची तयारी केली आहे. आता सीरियाच्या सीमेवरून अमेरिकेने सैन्य हटवल्यामुळे तुर्क आणि कुर्द यांच्यात थेट संघर्ष होण्याची शक्यता आहे.

युतीला मेगाभरती पडली भारी, बंडोबांनी दंड थोपडले दारोदारी, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2019 07:42 AM IST

ताज्या बातम्या