'प्रखर उन्हात कोरोना नष्ट होतो ना मग...', ट्रम्प यांचा आणखी एक अजब सल्ला

'प्रखर उन्हात कोरोना नष्ट होतो ना मग...', ट्रम्प यांचा आणखी एक अजब सल्ला

कोरोना व्हायरस टास्क फोर्सच्या प्रेझेंटेशनवेळी संशोधकांनी असा दावा केला की, सुर्याच्या प्रकाशात कोरोना व्हायरस 2 मिनिटात नष्ट होतो.

  • Share this:

वॉशिंग्टन, 24 एप्रिल : जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसा सर्वात मोठा दणका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास 9 लाखांपर्यंत पोहोचली असून मृतांचा आकडा 50 हजारांपेक्षा जास्त झाला आहे. यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अजब सल्ला दिला आहे . गुरुवारी कोरोना व्हायरस टास्क फोर्सच्या प्रेझेंटेशनवेळी संशोधकांनी असा दावा केला की, सुर्याच्या प्रकाशात कोरोना व्हायरस 2 मिनिटात मरतो. या दाव्यानंतर ट्रम्प यांनी अजब सल्ला दिला होता.

डोनाल्ट ट्रम्प म्हणाले की,'सूर्य प्रकाशासारखी पॉवर फुल लाइट रुग्णांच्या शरीरात पोहोचवा.' एवढंच नाही त्यांनी असंही सांगितलं की, 'शरीरात ब्लीच आणि आयसोप्रोपिल अल्कोहलसारख्या क्लीन्जरचं इंजेक्शन द्यायला हवं.' अमेरिकेताली होमलँड सिक्युरीटी डिपार्टमेंटमधील बिल ब्रायन यांनी सांगितलं होतं की, ब्लीच आणि आयसोप्रोपिल अल्कोहल व्हायरसला 5 मिनिटात आणि अल्कोहल 30 सेकंदात नष्ट करते. आयसोप्रोपिल अल्कोहलचा वापर डिटर्जंटसह इतर रसायनांमध्ये केला जातो.

ट्रम्प यांच्या अशा सल्ल्यामुळे वैज्ञानिक ब्रायन आणि टास्क फोर्सचे समन्वयक डेबोरा बिरक्स यांनाही धक्का बसला. व्हाइट हाउसमध्ये माहिती देताना ब्रायन यांनी जेव्हा सूर्यप्रकाशामुळे कोरोना व्हायरस नष्ट होऊ शकतो अशी माहिती दिली तेव्हा ट्रम्प म्हणाले की, तुम्ही हा प्रकाश त्वचा किंवा इतर कोणत्या माध्यमातून शरीरात पोहोचवला. मला वाटतं की तुम्ही याचीही टेस्ट कराल.

वाचा : हे इंजेक्शन वापरून बरा होणारा कोरोना, ट्रम्प यांचा दावा खरा की खोटा?

माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी सांगितलं की, जेव्हा मी पहिल्यांदा लोकांना सांगितलं होत की सूर्य प्रकाशाच्या प्रखर किरणांमुळे आणि उष्णतेमुळे कोरोना नष्ट होतो तेव्हा कोणीही मान्य केलं नव्हतं. तीच गोष्ट आता ब्रायन यांनी सर्वांसमोर सिद्ध केली आहे.

हे वाचा : सिगरेट ओढणाऱ्यांमध्ये Corona चं प्रमाण कमी; फ्रान्स करणार निकोटिनचे उपचार

जगात आतापर्यंत कोरोनामुळे 1,91,074 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 27 लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. जगभरात 7 लाख 49 हजार लोक बरे झाले आहेत. अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक वेगानं प्रादुर्भाव होत असून गेल्या 24 तासात 3 हजार लोकांनी प्राण गमावले आहेत.

हे वाचा : कोरोनामुळं घरच्यांनी सोडली साथ! स्मशानाबाहेर एक तास मृतदेह राहिला पडून अखेर...

First published: April 24, 2020, 5:30 PM IST

ताज्या बातम्या