मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

पराभवानंतर ट्रम्प White House सोडण्यास तयार, पण घातली ही अट

पराभवानंतर ट्रम्प White House सोडण्यास तयार, पण घातली ही अट

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर देखील सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे सूर बदललेले नाहीत. आपण व्हाईट हाऊस (White House) सोडण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं, पण यासाठी त्यांनी एक अट घातली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

वॉशिंग्टन, 28 नोव्हेंबर : अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर देखील सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे सूर बदललेले नाहीत. निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप ते वारंवार करत आहेत. थॅंक्सगिव्हिंगच्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपण व्हाईट हाऊस (White House) सोडण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं, पण यासाठी त्यांनी एक अट घातली आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन हे शपथ घेणार आहेत.

काय आहे ट्रम्प यांची अट?

पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले, इलेक्टोरल कॉलेजच्या वतीने औपचारिकपणे जो बायडन विजेते घोषित झाल्यास ते व्हाईट हाऊस सोडण्यास तयार आहेत. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप ट्रम्प वारंवार करत आहेत. पराभव झाल्याचं मानणं अवघड असल्याचं म्हणून त्यांनी पुन्हा एकदा घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. महत्त्वाचे म्हणजे निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ट्रम्प यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करत अनेक खटले दाखल केले होते, पण यामध्ये त्यांना अपयश आलं. त्यानंतर नुकतेच पेनिसिल्व्हेनियामधील न्यायालयात देखील त्यांची याचिका फेटाळण्यात आली होती. अमेरिकेत ज्या उमेदवाराला सर्वाधिक इलेक्टोरल मतं मिळतात तो विजयी होतो. पॉप्युलर व्होटच्या तुलनेत इलेक्टोरल व्होटला महत्त्व दिले जाते. या निवडणुकीत बायडन यांना 306 इलेक्टोरल मते मिळाली होती. त्याचबरोबर बायडन यांनी ट्रम्प यांच्यापेक्षा 60 लाखांहून अधिक पॉप्युलर मते मिळवली होती. या निवडणुकीतील मतांना औपचारिक रूप देण्यासाठी 14 डिसेंबरला बैठक होणार आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कोरोना लसीसाठी तयार

अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन नागरिकांना लस देण्यासाठी तयार आहेत. थॅंक्सगिव्हिंगच्या दिवशी त्यांनी या लसींची डिलिव्हरी पुढील आठवड्यापासून सुरु होणार असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर सुरुवातीला ही लस फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे, असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.

First published: