मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

दुसऱ्यांदा महाभियोग दाखल झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

दुसऱ्यांदा महाभियोग दाखल झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर बुधवारी दुसऱ्यांदा महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव पास करण्यात आला. युएस कॅपिटोल (US Capitol) हिलमध्ये झालेल्या हिंसाचारात विद्रोह करण्यासाठी उचकवल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर करण्यात आला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
वॉशिंग्टन, 14 जानेवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर बुधवारी दुसऱ्यांदा महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव पास करण्यात आला. युएस कॅपिटोल (US Capitol) हिलमध्ये झालेल्या हिंसाचारात विद्रोह करण्यासाठी उचकवल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर करण्यात आला आहे. दोनवेळा महाभियोगाची प्रक्रिया होणारे ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत. ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग मंजूर करून घेण्यासाठी दहा रिपब्लिकन्सनीही डेमोक्रॅट्स पक्षाची साथ दिली. अमेरिकी सदनाच्या बहुतेक सदस्यांनी ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्यात यावा, यासाठी मत दिलं. ट्रम्प यांच्याविरुद्ध जॅमी रस्किन, डेव्हिड सिसिलिने आणि टेड लियू या खासदारांनी महाभियोग प्रस्ताव तयार केला आणि प्रतिनिधी सभेच्या 211 सदस्यांनी याला सह-प्रयोजित केलं. हा प्रस्ताव सोमवारी सदनासमोर ठेवण्यात आला. याआधी प्रतिनिधी सभेने 18 डिसेंबर 2019 साली ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग पारित करून घेतला होता, पण रिपब्लिकन पक्षाचं नियंत्रण असलेल्या सिनेटने फेब्रुवारी 2020 मध्ये त्यांना या आरोपातून मुक्त केलं. त्यावेळी ट्रम्प यांच्यावर युक्रेनच्या राष्ट्रपतींवर दबाव टाकून जो बायडन आणि त्यांच्या मुलाची भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप झाला होता. ट्रम्प यांची प्रतिक्रिया दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर दुसऱ्यांदा दाखल करण्यात आलेल्या महाभियोगावर प्रतिक्रिया दिली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे. कॅपिटोल हिलवर झालेल्या हल्ल्याची आपण निंदा करतो, यात कोणतंही कारण किंवा अपवाद नाही, अमेरिका कायदे मानणारा देश आहे. मागच्या आठवड्यात ज्यांनी हल्ला केला, त्यांच्यावर कडक कारवाई होईल, असं ट्रम्प म्हणाले. तर दुसरीकडे ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आलं आहे, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
First published:

पुढील बातम्या