Home /News /videsh /

मेलानिया यांच्यापेक्षा ट्रम्प यांचे वय होतं दुप्पट, 5 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर केलं होतं लग्न

मेलानिया यांच्यापेक्षा ट्रम्प यांचे वय होतं दुप्पट, 5 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर केलं होतं लग्न

1998 साली ट्रम्प आणि मेलानिया यांची प्रेमकहाणी सुरू झाली. त्यावेळी ट्रम्प 52 तर मेलानिया फक्त 28 वर्षांच्या होत्या.

    मुंबई, 06 मे : आपल्यापेक्षा वयानं लहान असणाऱ्या स्त्रियांकडे पुरुष जास्त आकर्षित होतात असं एका रिसर्चमधून समोर आलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांची पत्नी त्यांच्यापेक्षा 24 वर्षांनी लहान आहे. 5 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी लग्न केलं. 1998 साली ट्रम्प आणि मेलानिया यांची प्रेमकहाणी सुरू झाली. त्यावेळी ट्रम्प 52 तर मेलानिया फक्त 28 वर्षांच्या होत्या. न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअरमधील पार्टीत त्यांची नजरानजर झाली आणि तिथुनच त्यांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली. त्यानंतर दोघेही 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. 2004 साली 1.5  मिलियन डॉलरची डायमंड रिंग मेलानिया यांच्या बोटात घालून त्यांना लग्नासाठी प्रपोज केलं. पुरुष हे नेहमीच आपल्यापेक्षा कमी वयाच्या स्त्रियांकडे जास्त आकर्षित होतात. एका रिसर्चमधून ही गोष्ट समोर आली आहे की वयानं लहान असलेल्या स्त्रिया त्यांच्या पार्टनरच्या आयुष्यात विशेष दखल देत नाहीत. तेच जर समवयस्क जोडीदार असेल तर वाद होण्याची शक्यता असते. जास्त वयाची स्त्री जोडीदार असेल तर खासगी आयुष्यात ढवळाढवळ करते. खासगी आयुष्य उरत नाही. त्यामुळे हे एक महत्त्वाचं कारण असल्याचं म्हटलं जातं. लाइफस्टाइबाबत जास्त दक्ष 25 ते 35 वयोगटातील सर्व स्त्रिया ह्या आपल्या लाइफस्टाइल आणि फिटनेसकडे विशेष लक्ष देतात. त्यामुळे त्यांचं सौंदर्य भुरळ पाडणारं असतं. त्यानंतर त्या मुलं-घर यामध्ये अडकून जातात. त्यामुळे स्वत:च्या फिटनेसकडे सौंदर्याकडे लक्ष देण्याएवढा वेळ मिळत नाही. आत्मविश्वास 25 ते 35 वर्षातील वयोगटातील महिलांमध्ये आत्मविश्वासाचं प्रमाण अधिक असतं. त्यांचे विचार सकारात्मक असतात. रिस्क घेऊन ती पूर्ण करण्याची ताकद असते. आपल्या पतीची मदत करण्यासाठी त्या कायम तयार असतात. याचा चांगला परिणाम पतीच्या आयुष्यावर होत असतो. तणावमुक्त जीवनशैलीवर भर... 50 नंतर वय वाढल्यानं पुरुषांना एकटेपणा जास्त जाणवतो. त्यावेळी कमी वयाचा पार्टनर असेल तर आपला एकटेपणा दूर करण्यासाठी मदत होते. हे वाचा : चीनचं करायचं काय? लस तयार करण्यासाठी वादग्रस्त कंपन्यांना दिली परवानगी कारण...
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Trump

    पुढील बातम्या