ज्युनिअर ट्रम्प घेणार घटस्फोट, 13 वर्षांचं वैवाहिक नातं येणार संपुष्टात

ज्युनिअर ट्रम्प घेणार घटस्फोट, 13 वर्षांचं वैवाहिक नातं येणार संपुष्टात

डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर आणि त्याची पत्नी वेनेसा ट्रम्प या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

16 मार्च : डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर आणि त्याची पत्नी वेनेसा ट्रम्प या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. वेनेसाने मॅनहॅटन सर्वोच्च न्यायालयात घटस्फोटासाठीचा अर्ज दाखल केला आहे. डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर आणि वेनेसा यांचे १३ वर्षांचे नाते या घटस्फोटामुळे संपुष्टात येणार आहे.

ट्रम्प ऑर्गनायझेशनच्या स्थापनेपासूनच मी आनंदी नाही असे वेनेसाने आपल्या घटस्फोटासाठी दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे.डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर आणि वेनेसा यांचे लग्न २००५मध्ये झाले होते. एका फॅशन शोमध्ये या दोघांचे नाते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समोर आणले होते. या दोघांचे लग्न जमवण्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा वाटा होता.

डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यापासूनच ट्रम्प कुटुंबातील सदस्यांकडे सगळ्या जगाचे लक्ष आहे. ही बाब वेनेसाला मुळीच पटली नव्हती. तसेच तिला तिच्या मुलांबाबतही सारखी काळजी लागून राहिलेली असे.

डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरने हल्ली वेनेसाला वेळ देणे बंद केले होते. मागील वर्षी डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर काही काळासाठी घर सोडून अज्ञात स्थळी राहिला होता. तसेच तो मुलांकडेही लक्ष देत नव्हता. या सगळ्या कारणांमुळे वेनेसा वैतागली होती त्याचमुळे या दोघांचे नाते संपुष्टात येणार असे संकेत मिळत होते. वेनेसाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याने या दोघांचे १३ वर्षांचे वैवाहिक नाते संपुष्टात आले आहे.

First published: March 16, 2018, 2:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading