लोकप्रियतेच्या शिखरावर असताना ट्रम्प यांचे तब्बल 88.8 दशलक्ष फॉलोअर्स होते. दरम्यान ट्रम्प सातत्याने निवडणूकीत गैरप्रकार झाल्याचे आरोप करणारे, त्यांनीच निवडणूक जिंकली असल्याचा दावा करणारे ट्वीट्स करत होते. अगदी अलीकडेच त्यांनी ‘आम्ही हरूच शकत नाही’(No way we Lost) असं ट्वीट केलं आहे. मतदानात गैरप्रकार झाल्याचे कोणतेही पुरावे नसताना देखील रिपब्लिकन पक्षानेच निवडणूक जिंकल्याचा दावा ते करत आहेत. ट्विटरने देखील त्यांच्या ट्वीटसची पडताळणी करून बहुतांश पोस्टस या चुकीच्या असल्याचं म्हटलं आहे. मात्र अद्यापही ट्रम्प यांना ते हरल्याचं पटलं आहे असं वाटत नाही. (हे वाचा-पहिल्यांदाच एक भारतीय BATA चा बॉस; ग्लोबल CEO बनले संदीप कटारिया) जो बायडन हे आपल्या पहिल्याच अध्यक्षीय निवडणूकीत 80 दशलक्षपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले आहेत आणि नोव्हेंबर अखेरपर्यंत झालेल्या मतमोजणीचा निकाल बाकी आहे. एवढ्या मताधिक्याने विजय मिळवूनही ट्रम्प बायडेन यांचा विजय नाकारत आहेत. जो बायडन (Joe Biden) यांचे ट्वीटरवर 1 डिसेंबरपर्यंत 20.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. सोशल बेकर्सच्या मते गेल्या आठवड्यापासून त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.Surely not the most important metric in the world, but still worth noting: For the first time since 2015, Trump is consistently losing followers on here. @FactbaseFeed has measured small declines for 11 days in a row. pic.twitter.com/BZzXJ2D0SJ
— Brian Stelter (@brianstelter) November 29, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Donald Trump