S M L
Football World Cup 2018

डोनाल्ड ट्रम्प यांनी केली परराष्ट्रमंत्र्यांची हकालपट्टी, टि्वटवर केलं जाहीर

त्यांच्या जागीचे सीआयएचे अध्यक्ष माईक पॉम्पिओ यांची वर्णी लागलीये.

Sachin Salve | Updated On: Mar 14, 2018 11:58 AM IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी केली परराष्ट्रमंत्र्यांची हकालपट्टी, टि्वटवर केलं जाहीर

14 मार्च : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच ट्विट करून याबाबत माहिती दिली. त्यांच्या जागीचे सीआयएचे अध्यक्ष माईक पॉम्पिओ यांची वर्णी लागलीये.

डोनाल्ड ट्रम्प आणि टिलरसन यांच्यात काही महिन्यांपासून खटके उडत होते. या पदासाठी त्यांनी एक्झॉन मोबील या बलाढ्य तेल कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. टिलरसन यांच्यासोबत आपले मतभेद होते. काही गोष्टींवर आमच्या एकवाक्यता नव्हती असंही ट्रम्प यांनी जाहीरपणे सांगितलं होतं.

ट्रम्प यांनी टि्वट करून, "माईक पॉम्पिओ हे सीआयएचे नवे अध्यक्ष असतील आणि ते परराष्ट्र मंत्री असतील. ते चांगलं काम करतील अशी अपेक्षा आहे. टिलरसन यांनी दिलेल्या सेवेबद्दल आभार" अशी माहिती दिली.

तसंच डोनाल्ड ट्रम्प यांनी जीना हास्पेल यांची सीआयएच्या प्रमुखपदी नियुक्ती केली. हास्पेल या सीआयएच्या प्रमुखपदी निवड  होणाऱ्या  पहिल्यांच  महिला ठरल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2018 11:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close