मोदींपाठोपाठ ट्रम्प यांनीही चीनला दिला जोरदार धक्का; चिनी धनाढ्यांनाही अमेरिकेत होणार प्रवेशबंदी

मोदींपाठोपाठ ट्रम्प यांनीही चीनला दिला जोरदार धक्का; चिनी धनाढ्यांनाही अमेरिकेत होणार प्रवेशबंदी

हा निर्णय लागू झाला तर त्याचा फटका तब्बल 90 लाखांपेक्षा जास्त चिनी लोकांना बसू शकतो. अमेरिकेने हा निर्णय घेतल्यास चीन काय निर्णय घेईल याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन 17 जुलै: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक निर्णय घेत चीनला जोरदार दणका देण्याचा प्रयत्न केला. आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असलेल्या सगळ्यांनाच अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा निर्णय ट्रम्प घेऊ शकतात. ट्रम्प प्रशासन त्यासाठीच्या निर्णयावर विचार करत आहे. तो निर्णय झाला तर अलीबाब या बलाढ्य कंपनीचे मालक जॅक मा यांनाही अमेरिकेत प्रवेशबंदी होणार आहे.

चीनच्या जवळपास सगळ्याच बड्या कंपन्यांचे मालक हे कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य आहेत. त्यांची संख्या 8 हजारांच्या आसपास असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. हा निर्णय लागू झाला तर त्याचा फटका तब्बल 90 लाखांपेक्षा जास्त चिनी लोकांना बसू शकतो.

कोरोनाच्या उद्रेकानंतर चीन आणि अमेरिकेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अध्यक्ष ट्रम्प हे तर दररोज ट्विटरच्या माध्यमातून चीनवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. चीननेच कोरोना व्हायरस जगात पसरवला असा जाहीर आरोप ते वारंवार करत आहेत.

PM मोदींचा षट्कार; चिनी कंपन्यांचे तब्बल 800 कोटी रुपये पाण्यात

या वादाचा परिणाम व्यापारावर झाला असून चीन आणि अमेरिकेला त्याचा जोरदार फटका बसला आहे. तर त्यामुळे जागतिक अर्थव्यस्थेलाही जोरदार फटका बसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अमेरिकेतल्या अनेक दिग्गज कंपन्या या चीनध्ये आपल्या मालाचं उत्पादन करत असतात. चीनमध्ये उत्पादनमुल्य कमी असल्याने या कंपन्यांना फायदा होतो. अमेरिकेने हा निर्णय घेतल्यास चीन काय निर्णय घेईल याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे.

चीनचं कंबरड मोडलं; टिकटॉकनंतर मोदी सरकारने यावरही आणली बंदी

मात्र सर्व जगात आर्थिक मंदी असतांना या वादाचा फटका सर्व जगाच्या अर्थचक्रालाच होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 17, 2020, 8:37 PM IST

ताज्या बातम्या