वॉशिंग्टन 15 नोव्हेंबर: अमेरिकेचे मावळे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अखेर आपला पराभव मान्य केला आहे. जो बायडेन (Joe Biden) यांना विजय मिळाल्याचं त्यांनी आत्तापर्यंत मान्यच केले नव्हते. मात्र पहिल्यांदाच ट्रम्प यांनी त्याबाबत वक्तव्य केलं आहे. जो बायडेन जिंकले मात्र त्यांचा तो विजय हा गैरमार्गाने मिळवलेला आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. अनेक गैरप्रकार करून त्यांनी तो विजय मिळवल्याची आगपाखडही त्यांनी पुन्हा एकदा केली. निवडणूक निकालांविरूद्ध त्यांनी या आधीच न्यायालयात दाद मागितली आहे. जानेवारी महिन्यात नवे अध्यक्ष शपथ घेणार आहेत. मात्र ट्रम्प अजुनही बायडेन यांना सहकार्य करण्यास तयार नसून त्यांनी अध्यक्षांचं निवासस्थान असलेलं व्हाईट हाऊसही अद्याप सोडलेलं नाही.
ट्रम्प यांनी पराभव मान्य करावा असं त्यांना त्यांच्या अनेक सहकार्यांनीही सांगितलं होतं. मात्र त्यांनी ते मान्य केलं नाही. जगभरातल्या नेत्यांनी जो बायडेन यांना शुभेच्छाही दिल्या आहे. मात्र ट्रम्प यांनी पराभव मान्य न करत हेकेखोरपणा सुरूच ठेवला होता.
नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये (US Election 2020) डेमोक्रेटिक पक्षाच्या जो बायडन (Joe Biden) यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे बायडन आपली पत्नी आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन त्यांच्यासह व्हाईट हाऊसमध्ये रहायला जाणार आहेत. पण केवळ जो बायडन आणि त्यांच्या पत्नीच व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करणार नसून जर्मन शेफर्ड जातीचे बायडन यांचे दोन पाळीव श्वान देखील प्रवेश करणार आहेत. चॅम्प आणि मेजर अशी या दोन श्वानांची नावे आहेत. त्यामुळे पेनिसिल्वेनियामधून वॉशिंग्टनमध्ये पुढील वर्षी राहायला जाणार आहेत.
Trump admits Biden "won" but asserts election was "rigged""
Read @ANI Story | https://t.co/rsnVySBkWn pic.twitter.com/eBLRcGiAxa
— ANI Digital (@ani_digital) November 15, 2020
दोन्हीही श्वान आधीपासूनच सोशल मीडियावर सेलिब्रिटी असून जो बायडन राष्ट्रपती होण्याआधी देखील दोघे सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत. बायडन यांच्या प्रचारादरम्यान देखील त्यांच्या पुढच्या पायांत बायडन यांचे बॅनर अडकवून प्रचार करतानाचे या कुत्र्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. जो बायडन यांच्या विजयामुळे व्हाईट हाऊसमध्ये पुन्हा एकदा श्वानांचा प्रवेश होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या कालखंडात व्हाईट हाऊसमध्ये श्वान नव्हते. परंतु बायडन हे काही श्वान घेऊन जाणारे पहिले राष्ट्रपती नाहीत. त्यांच्याआधी देखील राष्ट्रपतींनी श्वान व्हाईट हाऊसमध्ये नेले आहेत. परंतु दत्तक घेतलेले श्वान घेऊन जाणारे बायडन हे पहिलेच राष्ट्रपती ठरले आहेत. क्लिंटन अध्यक्ष असताना त्यांनी एक दत्तक घेतलेली मांजर व्हाइट हाउसमध्ये नेली होती.