मराठी बातम्या /बातम्या /विदेश /मेहुल चोक्सीला झटका, डोमिनिका सरकारनं दिला मोठा निर्णय

मेहुल चोक्सीला झटका, डोमिनिका सरकारनं दिला मोठा निर्णय

PNB Scam: हिरे व्यापारी (Diamantaire) मेहुल चोक्सी (Mehul Choksi)ला डोमिनिका सरकारनं चांगलाच झटका दिला आहे.

PNB Scam: हिरे व्यापारी (Diamantaire) मेहुल चोक्सी (Mehul Choksi)ला डोमिनिका सरकारनं चांगलाच झटका दिला आहे.

PNB Scam: हिरे व्यापारी (Diamantaire) मेहुल चोक्सी (Mehul Choksi)ला डोमिनिका सरकारनं चांगलाच झटका दिला आहे.

डोमिनिका, 10 जून: देशातील (India) पंजाब नॅशनल बँकेचं (Punjab National Bank) 13 हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून फरार झालेला हिरे व्यापारी (Diamantaire) मेहुल चोक्सीला (Mehul Choksi) डोमिनिका सरकारनं चांगलाच झटका दिला आहे. डोमिनिका सरकारनं मेहुल चोक्सीला बेकायदेशीर प्रवासी (अवैध स्थलांतर) (Illegal Immigrant) म्हणून घोषित केलं आहे. डोमिनिका सरकारकडून 25 मे रोजी एक आदेश जारी करण्यात आला होता.

अँटीग्वामध्ये (Antigua) राहणारा चोक्सी 23 मे रोजी डोमिनिका येथे पोहोचला होता. तेव्हा त्याला डोमिनिका पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तो अजूनही पोलीस कोठडीत आहे. मेहुल चोक्सीनं जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. मात्र त्यावर अद्याप सुनावणी झाली नाही.

समोर आलेल्या माहितीनुसार, डोमिनिका सरकारनं न्यायालयासमोर कागदपत्रं सादर केली आणि मेहुल चोक्सीचा याचिका फेटाळावी अशी विनंती केली. तसंच त्याला भारतात पाठवावं, अशी विनंतीही डोमिनिका सरकारनं न्यायालयाकडे केली आहे. दरम्यान सरकारनं दिलेला निर्णय मेहुल चोक्सीसाठी एक मोठा झटका आहे.

हेही वाचा-  मालवणी इमारत दुर्घटना: मृतांमध्ये 6 लहान मुलांचा समावेश, मृतांचा आकडा 11 वर

चोक्सीनं स्वतःच रचला अपहरणाचा कट

मेहुल चोक्सी (Mehul Choksi) सध्या त्याच्या कथित अपहरण (Kidnapping) नाट्यामुळे चर्चेत आला होता. अँटीग्वामधून (Antigua) डोमिनिकाला गेलेल्या चोक्सीनं आपल्याला भारतात परत नेण्यासाठी भारत सरकारनं जबरदस्तीनं डोमिनिकाला (Dominica) नेल्याचा आरोप केला होता. मात्र अँटीग्वा सरकार त्याला परत भारतात पाठविण्यासाठी तयार असल्याचं त्यानं स्वतःच आपल्या अपहरण नाट्याची कहाणी तयार केल्याची धक्कादायक माहिती भारतीय गुप्तचर स्रोतांनी उघडकीस आणली आहे. सीएनएन-न्यूज 18 ला त्यांनी ही माहिती दिली असून या प्रकरणात चोक्सीला मदत करणाऱ्या एका फरारी एजंटचे फोटोही सीएनएन-न्यूज 18 ला मिळाले आहेत. या व्यक्तीचा शोध घेण्यात येत असल्याचं अँटीग्वा पोलिसांनी सांगितलं आहे.

ही व्यक्ती चोक्सीला समुद्रमार्गे क्युबाला (Cuba) घेऊन जाणार होती. पण डोमिनिकामध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आल्यानं त्यांचा हा डाव फसल्याचं पोलीस चौकशी दरम्यान सिद्ध झालं आहे. अँटिग्वा सोडून क्युबामध्ये स्थायिक होण्याची चोक्सीची योजना असल्याचं तसंच चोक्सीकडं अँटिग्वा आणि बार्बुडासह आणखी एका कॅरेबियन देशाचे नागरिकत्व असल्याची माहिती अँटिग्वामधील चोक्सीचा जवळचा मित्र गोविन (Govin) यानं पोलिसांना दिली.

First published:

Tags: Pnb bank