आता 'लॅब'मध्ये जाण्याची गरज नाही, कुत्राच घरी येऊन करणार COVID-19ची टेस्ट

आता 'लॅब'मध्ये जाण्याची गरज नाही, कुत्राच घरी येऊन करणार COVID-19ची टेस्ट

कोरोना रुग्णांचा गंध या कुत्र्यांना देण्यात येणार आहे. त्याच्या वासातून त्यांना अशा माणसांना ओळखणं शक्य होणार आहे.

  • Share this:

बॉन 29 जुलै: कोरोना व्हायरस बाधित लोकांची तपासणी करण्याचा प्रचंड ताण हा सध्या तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांवर येत आहे. हा ताण कमी करण्याचा प्रयत्न जर्मनीच्या एका विद्यापीठाने केला आहे. या विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं असून ते मानवी लाळेच्या फक्त वासावरून तो व्यक्त कोरोनाबाधित आहे की नाही याचा निकाल देणार आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगानंतर त्याचे निष्कर्ष हे 94 टक्के योग्य आल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

हा प्रयोग पूर्ण यशस्वी ठरला तर गर्दीच्या ठिकाणी, किंवा मैदानावर त्याचा प्रयोग केला जाऊ शकतो. त्याच बरोबर हा प्रशिक्षित कुत्रा गरज पडली तर संशयित रुग्णांच्या घरी जाऊनही टेस्ट करू शकणार आहे. त्यामुळे गर्दीही टाळता येईल असं तत्ज्ञांंत मत आहे.

कॅन्सर, मलेरिया, पार्किन्सन असा आजार असलेल्या माणसांना ओळखण्याचं काम कुत्र्यांच्या माध्यमातून करता येतं. जगात अनेक देशांमध्ये ते केलंही जातं. आता अशा काही जातीवंत कुत्र्यांना घेऊन कोरोनाबाधित रुग्णांचा छडा लावता येईल का या वर संशोधन केलं जात आहे.

पुढच्या आठवड्यापासून राज्यात मॉल उघडणार, इतर निर्बंध मात्र 31 ऑगस्टपर्यंत वाढले

कुत्र्यांजवळ गंध ओळखण्याची आणि घेण्याची खास क्षमता असते. सुरक्षेसाठीही त्याचा वापर केला जातो.

त्याचबरोबर चोरांचा माग काढणं, भूसुरूंग ओळखणं, स्फोटकांचा छडा लावणं अशा कामांमध्येही त्यांची मदत होते. पोलीस आणि लष्करामध्ये तर कुत्र्यांचा खास विभागही असतो. याच कौशल्याचा वापर कोरोनासाठी करता येईल का याची चाचपणी करण्यात येत आहे.

कोरोना रुग्णांचा गंध या कुत्र्यांना देण्यात येणार आहे. त्याच्या वासातून त्यांना अशा माणसांना ओळखणं शक्य होणार आहे. तासाभरात ही कुत्री २० माणसांचा ओळखू शकतील. म्हणजेच लॅबमधल्या टेस्टपेक्षाही कमी वेळात अशा माणसांचा छडा लावण्यात येणार आहे.

40 टक्के मुंबईकर स्वबळावर कोरोनामुक्त झाले, तुम्ही काय 'करुन दाखवलं?

या कुत्र्यांच्या ट्रेनिंग नंतर काही माणसांवर त्याची चाचणी होणार असून त्यानंतर गर्दीच्या ठिकाणी किंवा हॉस्पिटलमध्ये अशा डॉक्टर कुत्र्यांना तैनात करण्यात येणार आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 29, 2020, 11:22 PM IST

ताज्या बातम्या