मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

चीन आखतोय नवा खतरनाक प्लान?, रस्त्यावर बंद पिशवीत आढळले जिवंत कुत्रे, मांजर

चीन आखतोय नवा खतरनाक प्लान?, रस्त्यावर बंद पिशवीत आढळले जिवंत कुत्रे, मांजर

चीनमध्ये (china) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे येथील रस्त्यांवर बंद पिशव्यांमध्ये जिवंत कुत्रे (dog) आणि मांजर (cat) सापडत आहेत.

चीनमध्ये (china) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे येथील रस्त्यांवर बंद पिशव्यांमध्ये जिवंत कुत्रे (dog) आणि मांजर (cat) सापडत आहेत.

चीनमध्ये (china) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे येथील रस्त्यांवर बंद पिशव्यांमध्ये जिवंत कुत्रे (dog) आणि मांजर (cat) सापडत आहेत.

  शांघाय, 20 एप्रिल : चीनमध्ये (china) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे येथील रस्त्यांवर बंद पिशव्यांमध्ये जिवंत कुत्रे (dog) आणि मांजर (cat) सापडत आहेत. हा प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. एका पिशवीत एकापेक्षा जास्त कुत्रे किंवा मांजर दिसत असल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे ते पाळीव प्राणी आहेत ज्यांच्या मालकांना कोरोना झाला आहे आणि आता प्रशासन या प्राण्यांना मारत आहे, असे सांगितले जात आहे. मात्र, यासंदर्भात सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. चीनने कोरोनाबाबत झिरो टॉलरन्सचे धोरण काटेकोरपणे अवलंबले आहे आणि लोकांना लॉकडाऊनचे कडक पालन करायला लावले आहे. 26 दशलक्ष लोक घरात बंद  चीनच्या रस्त्यांवर चित्रित करण्यात आलेल्या या व्हिडिओंमध्ये कचऱ्याच्या पिशव्या जिवंत मांजरी आणि कुत्र्यांनी भरल्याचे दिसून येते, असे ब्रिटिश वृत्तपत्र मिरर यूकेने सांगितले. काहींमध्ये तर ते या मोठ्या पिशव्यांमध्ये फिरतानाही दिसत आहेत. टि्वटरवर हा व्हिडिओ सर्वप्रथम कमेंटसह अपलोड करण्यात आला. या कमेंटमध्ये लिहिले होते, 'शांघायमध्ये 26 दशलक्ष लोक लॉकडाऊनमध्ये आहेत'. लोक त्यांच्या बाल्कनीतून आत्महत्या करत आहेत आणि कोरोना पॉझिटिव्ह लोकांच्या पाळीव प्राण्यांना मारण्यासाठी अशा योजना केल्या जात आहेत. हे वाईट आहे, असेही ट्विटरवर म्हटले गेले. हेही वाचा - रेल्वे कंपनीने महिला कर्मचाऱ्यांना दिला अतिशय विचित्र युनिफॉर्म; विरोध होताच केला अजब दावा 45 शहरांमध्ये लॉकडाऊन
   गेल्या आठवड्यातील आणखी एका व्हिडिओमध्ये एक आरोग्य कर्मचारी पाळीव कुत्र्याला मारताना दिसला होते. चाचणीत या कुत्र्याचा मालक कोरोना पॉझिटिव्ह आढळला. शांघायमध्ये जवळपास 26 दिवसांपासून कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शांघायमध्ये लॉकडाऊनमुळे लोक अन्न, पाणी आणि औषधांसाठी झगडत आहेत. मार्चपासून चीनमध्ये ओमिक्रॉनची नवीन प्रकरणे वेगाने वाढली आहेत. त्यामुळे 45 शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या नियमावलीचे पालन न करणाऱ्याला दंड भरावा लागणार आहे तसेच त्याला तुरुंगात देखील टाकले जाणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cat, China, Corona spread, Dog

  पुढील बातम्या