...आणि स्टुडिओमध्ये अवतरला कुत्रा, पाहा अँकरची कशी उडाली भंबेरी !

...आणि स्टुडिओमध्ये अवतरला कुत्रा, पाहा अँकरची कशी उडाली भंबेरी !

  • Share this:

24 मे : एक ब्लॅक लाब्राडोर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. खरंतर जेथून सगळीकडे बातम्या पोहचवल्या जातात, त्या न्यूजरूममध्येच एक बातमी जन्माला आलीय.

झालं असं की, रशियातील एका वृत्तवाहिनीवर एक अँकर मॉस्को इथं झालेल्या विध्वंसाबाबतची बातमी सांगत होती. आणि अचानक स्टुडिओमध्ये एक ब्लॅक लाब्राडोर चालत आला. काही क्षण तिला कळेच ना की नक्की काय होतंय. सुरुवातीला तिने त्या कुत्र्याकडे लक्ष न देता अँकरींग सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. पण या साहेबांना टीव्हीवर झळकण्याची भारीच उत्सुकता होती वाटतं, म्हणूनच की काय तो डायरेक्ट खुर्चीवर चढून बसला...

आता या कुत्र्याकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचं लक्षात आल्यावर या अँकरने "आपल्यासोबत स्टुडिओमध्ये एक कुत्रा असल्याचं" जाहीर केलं. आणि घाबरत घाबरत "हा कुत्रा इथं काय करतोय?" असा प्रश्न विचारला.

एवढ्यावेळात कुत्राही ही तिथं शांत बसल्याचं पाहून, तिने त्या कुत्राला गोंजारत परिस्थिती सावरून घेतली आणि या पठ्यानेही मस्त टीव्हीवर झळकून घेतलं.

खरंतर हा कुत्रा एका दुसऱ्याच शोसाठी तिथे आला होता. पण त्याच्या गळ्यातला पट्टा सुटल्यामुळे तो थेट स्टुडिओमध्येच जाऊन बसला.

Loading...

हा सगळा प्रकार लाइव्ह टेलिकास्ट सुरू असताना घडल्याने, सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. या व्हायरल झालेला हा गमतीशीर व्हिडिओ आतापर्यंत तब्बल 35,00,000 लोकांनी पाहिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2017 05:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...