• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • भलतंच काही! शाळेचा अजब नियम, टॉयलेटला जाण्यासाठीही लागतं डॉक्टरांचं पत्र

भलतंच काही! शाळेचा अजब नियम, टॉयलेटला जाण्यासाठीही लागतं डॉक्टरांचं पत्र

मधल्या सुट्टीच्या अगोदर किंवा नंतर टॉयलेटला जायचं असेल, तर त्यासाठी डॉक्टरांचं पत्र अत्यावश्यक (Doctor's letter mandatory to go to toilet) असल्याचा नियम एका शाळेनं (Rule in the school) केला आहे.

 • Share this:
  लंडन, 20 सप्टेंबर : मधल्या सुट्टीच्या अगोदर किंवा नंतर टॉयलेटला जायचं असेल, तर त्यासाठी डॉक्टरांचं पत्र अत्यावश्यक (Doctor's letter mandatory to go to toilet) असल्याचा नियम एका शाळेनं (Rule in the school) केला आहे. या नियमाला काही पालकांनी आक्षेप घेतला (Parent's objection to the rule) असून विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा आणि मुलींची कुचंबना करणारा हा नियम असल्याची तक्रार केली आहे. काय आहे नियम? इंग्लंडच्या बुलवेल अकॅडमी स्कूलमध्ये हा नियम करण्यात आला आहे. यावर दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीच्या आईनं आक्षेप घेतला आहे. शाळेत टॉयलेटला जाण्यासाठी मधली सुट्टी देण्यात येते. मात्र त्याव्यतिरिक्त मुलं विनाकारक टॉयलेटचा बहाणा करून बाहेर जातात, असं या शाळेचं म्हणणं आहे. विद्यार्थ्यांना शिस्त लागावी आणि अभ्यासावर त्यांचं लक्ष केंद्रीत व्हावं यासाठी हा नियम तयार केल्याचं शाळेचं म्हणणं आहे. मात्र पालकांनी या नियमाला आक्षेप घेतला आहे. काय आहे आक्षेप? आपल्या मुलीला मासिक पाळीदरम्यान त्रास होत असून तिला अनेकदा मधूनच टॉयलेटला जाण्याची गरज असते. मात्र शाळेच्या नियमामुळे तिची कुंचबना होत असल्याचं तिच्या आईचं म्हणणं आहे. यासाठी डॉक्टरचे सर्टिफिकेट आणायला पालकांना पैसे खर्च करावे लागतात. एकदा आपण हे सर्टिफिकेट मुलीकडून पाठवून दिलं होतं. मात्र दर महिन्याला नवं सर्टिफिकेट आणण्याचा आग्रह शाळा करत असल्यामुळे हे अन्यायकारक आणि अनावश्यक असल्याचं पालकांचं म्हणणं आहे. हेे वाचा - काय सांगता! चेहरा रिंकल फ्री करणारं इंजेक्शन घेतल्यास कोरोना होत नाही? मुलींसाठी दरवेळी सर्टिफिकेट दाखवून टॉयलेटला जाणं ही बाब अपमानकारक असल्याचाही आक्षेप घेतला जात आहे. विद्यार्थ्यांना नैसर्गिक विधीसाठी जाण्यापासून रोखण्यात येऊ नये, असा नियम असताना शाळा कुठल्या आधारावर असे नियम करते, हा पालकांचा सवाल आहे. जर विद्यार्थी टॉयलेटच्या बहाण्याने बाहेर जात असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी किंवा टॉयलेटला जाऊन येण्यासाठी विशिष्ट वेळ ठरवून देण्यात यावी, अशी पालकांची मागणी आहे. मात्र दरवेळी टॉयलेटसाठी डॉक्टरांचं पत्र घेऊन येण्याच्या नियमाला जोरदार विरोध होत आहे.
  Published by:desk news
  First published: