वाचून आश्चर्य वाटेल! कोरोना रोखण्यासाठी बेघरांमध्ये दारू, तंबाखू आणि अमली पदार्थांचे वाटप

वाचून आश्चर्य वाटेल! कोरोना रोखण्यासाठी बेघरांमध्ये दारू, तंबाखू आणि अमली पदार्थांचे वाटप

खासगी डोनेशनच्या माध्यमातून बेघरांना यासर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत

  • Share this:

सॅन फ्रान्सिस्को, 8 मे : जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. संसर्ग पसरू नये यासाठी लोकांना घरीच थांबण्याचं आवाहन केलं जात आहे. या जीवघेण्या संकटात प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. असाच उपाय अमेरिकेतील प्रशासनाने अवलंबला आहे. मात्र तो ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. अमेरिका शहरातील सॅन फ्रान्सिंस्कोमध्ये कोरोना व्हारसच्या संकटात बेघर लोकांना दारू, तंबाखू आणि मारिजुआना (marijuana)  यांसारख्या अमली पदार्थांचे वाटप केले जात असल्याची बाब समोर आली आहे.

येथे खासगी डोनेशनच्या माध्यमातून व्यसन असलेल्यांना अमली पदार्थांचे वाटप केले जात आहे. सॅन फ्रान्सिंस्कोमध्ये अनेक बेघरांना अमली पदार्थांचं व्यसन आहे. अशा लोकांची प्रशासनाने कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी हॉटेलांमध्ये राहण्याची सोय केली आहे. मात्र हे लोक अमली पदार्थ शोधण्यास हॉटेल बाहेर पडत असल्याचे दिसून येत असल्याने त्यांना रोखण्यासाठी अमली पदार्थ उपलब्ध करुन दिले जात आहे.

डेली मेलच्या बातमीनुसार बुधवारपर्यंत येथील 270 बेघर लोकांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. यापैकी 11 जणांना दारू देण्यात आली आहे. 27 जणांना तंबाखू दिली गेली आहे तर 5 जणांना मेडिकल मारिजुआना देण्यात आला आहे. सॅन फ्रान्सिंस्को क्रॉनिकलने याबाबत माहिती दिली. काही खासगी डोनेशनमुळे बेघर लोकांना हे पदार्थ उपलब्ध करण्यात येऊ शकले आहे. दारू वा अमली पदार्थाचं व्यसन असल्याने त्याच्या शोधात हे लोक बाहेर जातात. यातून संसर्ग वाढण्याची भीती असते.

संबंधित -भारतीय वंशाच्या पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी UK च्या पंतप्रधानांचा कोटींचा करार

विदेशातून येणाऱ्या भारतीयांसाठी 5 स्टार क्वारंटाईन कक्ष, पालिकेनं अशी केली तयारी

First published: May 8, 2020, 7:50 AM IST

ताज्या बातम्या