Home /News /videsh /

चीनला अवैध मार्गानं मदत करणाऱ्या 400 CA आणि CS वर होणार मोठी कारवाई

चीनला अवैध मार्गानं मदत करणाऱ्या 400 CA आणि CS वर होणार मोठी कारवाई

चायनीज शेल कंपन्यांना (Chinese Shell Companies) मदत करणाऱ्या 400 चार्टर्ड अकाऊंटंट (Chartered Accountants) आणि कंपनी सेक्रेटरी (Company Secretaries) यांच्या विरोधात कारवाई होणार आहे.

    मुंबई, 19 जून : भारत आणि चीन (India - China) यांच्यातील संबंध गलवानमध्ये दोन वर्षांपूर्वी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये घडलेल्या चकमकीनंतर ताणले गेले आहेत. त्या घटनेनंतर केंद्र सरकारनं चीनी कंपन्यांच्या विरोधात अनेक कठोर पावलं उचलली आहेत. सरकारी नियमांच्या विरोधात चायनीज शेल कंपन्यांना (Chinese Shell Companies) मदत करणाऱ्या 400 चार्टर्ड अकाऊंटंट (Chartered Accountants)) आणि कंपनी सेक्रेटरी (Company Secretaries) यांच्या विरोधात कारवाई करण्याची शिफारस केंद्र सरकारनं केली आहे. हे सर्व जण महानगरातील आहेत. 'द हिंदू' नं हे वृत्त दिलं आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार ज्या सीए आणि सीएसच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे त्या सर्वांनी नियम आणि कायद्यांचे उल्लंघन केले आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात चीनी शेल कंपन्यांना मदत केली आहे. कॉर्पोरेट मंत्रालयाला दोन महिन्यांपूर्वी आर्थिक गुप्तचर एजन्सीनं दिलेल्या माहितीच्या आधारावर या कारवाईची शिफारस करण्यात आली होती. मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं मात्र या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. अफगाणिस्तानातील शिखांच्या मदतीला भारताची धाव, केंद्र सरकार देणार खास सवलत देशातील चार्टर्ड अकाउंट्सचे नियमन भारतीय चार्टर्ड अकाऊंटट संस्थेच्या (ICAI) मार्फत केले जाते. आयसीएआयनं या प्रकरणात देशातील वेगवेगळ्या कार्यालयातून चार्टर्ड अकाउंट्सनी चीनची सहकार्य केल्याची तक्रार मिळाल्याचं सांगितलं आहे. या तक्रारीच्या आधारे त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणाच्या सविस्तर चौकशीनंतरच याबात अधिक माहिती पुढे येईल. त्यामुळे याबाबत लगेच प्रतिक्रिया देणे घाईचे ठरेल, असे स्पष्ट केले आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: China, Crime, India

    पुढील बातम्या