मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

पुन्हा भडकला कोरियाचा हुकूमशहा; मंत्रालयातील 5 अधिकाऱ्यांना घातल्या गोळ्या

पुन्हा भडकला कोरियाचा हुकूमशहा; मंत्रालयातील 5 अधिकाऱ्यांना घातल्या गोळ्या

डिनर पार्टीत देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जीवावर बेतलं आहे.

डिनर पार्टीत देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जीवावर बेतलं आहे.

डिनर पार्टीत देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जीवावर बेतलं आहे.

  • Published by:  Sandip Parolekar
सियोल, 12 सप्टेंबर: डिनर पार्टीत देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जीवावर बेतलं आहे.  उत्तर कोरियातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी थेट देशाच्या अर्थव्यवस्थेवर सवाल केला होता. त्यामुळे हुकूमशहा किम जोंग हा प्रचंड भडकला होता. मंत्रालयातील त्या 5 अधिकाऱ्यानांना गोळ्या घाला, असे आदेश किम जोंग यानं दिले होते. दरम्यान, किम जोंग याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनमधून नॉर्थ कोरियात येणाऱ्यांनाही गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने पुन्हा एकदा आपली दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मृत्यूदंड देण्याची शिक्षा सुनावली आहे. हुकूमशहाच्या आदेशानंतर संबंधित अधिकाऱ्यांना गोळ्या घालण्यात आल्या आहे. उत्तर कोरियावरच्या प्रत्येक हलचालीवर लक्ष ठेऊन उसणारा दक्षिण कोरियाची वेबसाईट 'डेली एनके'नुसार उत्तर कोरियाच्या अर्थ मंत्रालयाच्या पाच अधिकाऱ्यांनी एका डिनर पार्टीत देशाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा केली होती. अधिकाऱ्यांनी असं करून किम शासनाच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं. चर्चेत संबंधित अधिकाऱ्यांनी देशात औद्योगिक सुधारणांची गरज असल्याचं म्हटलं होतं. उत्तर कोरियाला आपले निर्बंध हटवण्यासाठी परराष्ट्राची मदत घ्यायला हवी, याबाबतही अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती. हेही वाचा...विमानाने प्रवास करणार असाल तर सावधान, नाहीतर होऊ शकते कारवाई! 30 जुलैला दिला मृत्यूदंड... मिळालेली माहिती अशी की, अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी देशाच्या अर्थ व्यवस्थेवर चर्चा केल्याबाबतची माहिती हुकूमशहा किम जोंग उनला समजली होती. किम हा स्वत: अर्थ मंत्रालयाचा प्रमुख आहे. नंतर त्या पाचही अधिकाऱ्यांना किम याच्या समोर बोलावण्यात आलं. त्यांना आपला गुन्हा कबूल करण्यास मजबूर करण्यात आलं. नंतर 30 जुलैला पाचही अधिकाऱ्यांना गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना येडोक येथील एका राजकीय शिबिरात पाठवण्यात आलं आहे. किम जोंगने आपल्याच काकांचा केला होता शिरच्छेद.. सिंगापूरमध्ये ट्रम्प आणि किम जोंग यांची भेट झाली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी किमचं कौतुकही केलं होतं. अमेरिकचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांच्यावरच्या एका पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. वाशिंग्टन पोस्टचे संपादक आणि शोधपत्रकार पत्रकार बॉब वुडवर्ड यांनी हे पुस्तक लिहिलं असून त्यात ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याची अनेक गुपीतं उघड केली आहेत. किम हा आपल्याला त्याच्या अनेक गोष्टी सांगतो असं डोनाल्ड ट्रम्प यांनीच आपल्याला सांगितलं असा दावा लेखकाने केला आहे. त्यात किमच्या अनेक क्रुर कथाही आहेत. हेही वाचा... रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ काँग्रेस रस्त्यावर; 'बंगालच्या लेकी'साठी मोर्चा किम जोंग याने आपले काका जांग सांग थायक यांचा शिरच्छेद केला होता. त्यानंतर त्यांनी ते शीर सर्व अधिकाऱ्यांना दाखवलं होतं असं किम याने ट्रम्प यांना सांगितलं होतं. 2013ची ही घटना आहे. थायक यांना देशात काही सुधारणा करायच्या होत्या. मात्र किमचा त्याला विरोध होता. त्याच रागातून त्याने त्यांची हत्या केली होती. शांती चर्चेसाठी किम आणि ट्रम्प यांची भेट झाली होती त्यावेळी किम याने आपल्याला अशा अनेक गोष्टी सांगितल्या असा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे.
First published:

Tags: Kim jong un

पुढील बातम्या