उत्तर कोरिया, 12 ऑक्टोबर : उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग ऊन यांनी एका कार्यक्रमात जनतेसमोर माफी मागितली. यादरम्यान त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. हुकूमशाह किम यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले की, ते कोरोना व्हायरस महासाथीदरम्यान आपल्या जनतेसोबत उभं राहू शकले नाही. यासाठी मी माफी मागतो. पक्षाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना किम जोंग भावुक झाले.
किम जोंग ऊन यांनी आपल्या भाषणादरम्यान हे मान्य केलं की ते उत्तर कोरियाच्या नागरिकांचा विश्वास निभावू शकलो नाही. आणि यासाठी त्यांनी माफी मागितली. असं म्हणत असताना किम जोंग ऊन चष्मा काढून डोळे पुसू लागले. आपल्या पूर्वजांच्या महान कामाची आठवण करीत किम पुढे म्हणाले की, मला हा देश चालविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र माझे प्रयत्न आणि प्रामाणिकपणा माझ्या लोकांची समस्या कमी करण्यासाठी पूरेसा नाही.
मिसाइल Hwasong-15 जगासमोर केलं जाहीर
भावनिक भाषणादरम्यान किम जोंग म्हणाले की, जगभरातील जनता कोरोनामुळे त्रस्त आहे. त्यांनी दक्षिण कोरियासोबतचे संबंध चांगले करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या कार्यक्रमादरम्यान उत्तर कोरियाने परमाणू शस्त्रांसह 22 चाकांची गाडीवरुन दैत्याकार मिसाइल Hwasong-15 जगासमोर आणली. विशेषज्ञांनी चेतावनी दिली आहे की, हे मिसाइल अमेरिकेतील कोणत्याही कोपऱ्यात हल्ला करू शकतं. उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग ऊन यांनी हे मिसाइल काही दिवसांपूर्वी आपल्या सैन्य परेडमध्ये दाखविलं आहे. विशेषज्ञांचे म्हणणं आहे की, हे मिसाइल जगातील सर्वात लांब मिसाइलपैकी एक आहे.
भयंकर अशा मिसाइल्स पसंत असलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग यांनी एक अत्यंत घातक परमाणू मिसाइल तयार केलं आहे, जी अमेरिकेतील कोणतंही शहर उद्ध्वस्त करू शकते. उत्तर कोरियाने मिसाइल तयार केल्याची बातमी अशावेळी समोर आली आहे, जेव्हा किम जोंग आणि पश्चिमी देशांमधील संवाद थांबला आहे. या मिसाइलचं नाव Hwasong-15 आहे. आणि किम जोंग उन यांनी हे सैन्यदलाच्या परेडमध्ये सहभागी करून घेतलं होतं. उत्तर कोरियामध्ये शनिवारी सत्ताधारी वर्कर्स पार्टीचा 75 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यादरम्यान किम जोंग ऊन यांच्या संपूर्ण सैन्याचं शक्तीप्रदर्शन दाखविण्यात आलं