ढाका, 9 जुलै: बांगलादेशातून (Bangladesh) एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथील राजधानी ढाका येथे गुरुवारी भीषण दुर्घटना घडली. एका 6 मजली फॅक्टरीला आग (Fire) लागल्यामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. या दुर्घटनेत 52 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय 30 जणं जखमी झाले असून अजूनही मोठ्या संख्येने बेपत्ता असल्याची शक्यता आहे. जीव वाचविण्यासाठी अनेकांनी इमारतीवर उड्या घेतल्या. त्यातही अनेकजणं जखमी झाले आहेत.
इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापासून वरील सर्व मजल्यांना आग लागली होती. त्यानंतर तातड़ीने लोक स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करू लागले. स्वत:च्या बचावासाठी अनेकांनी तर वरच्या मजल्यावरुन खाली उड्या घेतल्या. (devastating fire on a 6 floor factory in Bangladesh 52 people dead )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी साधारण 5 वाजेदरम्यान रुपगंज भागात एका फूट अँड बेवरेज फॅक्टरीला आग लागली. शुक्रवारी दुपारपर्यंत आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यानंतर पोलीस आणि फायर डिपार्टमेंटरने दिलेल्या माहितीनुसार, 25 जणांना वाचविण्यात यश आलं आहे. ज्यांना वाचवण्यात आलं त्यांनी सांगितलेला अनुभव भयावह आहे. तेथे अडकलेलं कोणीच वाचू शकत नाही, असं बचाव झालेल्या नागरिकांनी सांगितलं.
हे ही वाचा-एका मशिनची कलाम,दूध नाही तर दारूपासून बनलं Ice Cream;मार्केटमध्ये अनोखा अविष्कार
फॅक्टरीमध्ये मजूर होते..
एका मजुराने सांगितलं की, जेव्हा आग लागली तेव्हा फॅक्टरीत अनेक मजुर होते. बांगलादेशात सुरक्षा नियमांचं पालन न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना समोर येत आहे. हा प्रकार वारंवार घडत असल्याचं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. फेब्रुवारी महिन्यात ढाका येथे काही अपार्टमेंटला आग लागल्याचे वृत्त समोर आले होते, यामध्ये तब्बल 70 जणांचा मृत्यू झाला होता.
पायऱ्यांवरील दारं होती बंद
एका मजुराने सांगितलं की, तिसऱ्या मजल्यावक आग लागल्यानंतर लोक पायऱ्यांच्या दिशेने धावले. मात्र दोन्ही बाजूने ही दारं बंद होती. यावेळी मजल्यावर साधारण 48 जणं होती. दुसऱ्या एका मजुऱाने सांगितलं की, आग लागल्यानंतर मजल्यावर काळा धूर जमा झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fire, International