लॉकडाऊनमुळे दूर झालेल्या प्रेमीयुगुलांना 'या' देशाने दिली सूट; भेटता येणार मात्र...

लॉकडाऊनमुळे दूर झालेल्या प्रेमीयुगुलांना 'या' देशाने दिली सूट; भेटता येणार मात्र...

डेन्मार्कने (denmark) शेजारील देशांसाठी आपल्या सीमा खुल्या केल्यात.

  • Share this:

कोपेनहेगन, 27 मे : जगातील अनेक देशांनी लागू केलेला लॉकडाऊन हळूहळू शिथील करायला सुरुवात केली आहे. मात्र काही अटी ठेवण्यात आल्यात. अशाच अटींपैकी एक म्हणजे जोडीदाराला भेटण्यासाठी प्रेमाचे पुरावे दाखवावे लागत आहेत. डेन्मार्क (denmark) देशाने आपल्या शेजारील देशांसाठी सीमा खुल्या केल्यात मात्र त्या देशातून डेन्मार्कमध्ये आपल्या प्रेमीला किंवा जोडीदाराला भेटण्यासाठी येणाऱ्यांना नियम लागू केला आहे.

डेन्मार्कशेजारील देशातील लोकांना डेन्मार्कमधील आपल्या होणाऱ्या जोडीदाराला, गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला भेटता येणार आहे. मात्र त्यांना आपल्या प्रेमाचे पुरावे दाखवावे लागणार आहेत.

हे वाचा - फक्त 2 आठवड्यात तब्बल 65 लाख लोकांची कोरोना टेस्ट; वुहानने नेमकं केली तरी कशी?

डेन्मार्कने शेजारील देशातील लोकांसाठी जारी केलेल्या नियमानुसार डेन्मार्कमध्ये तुमचा जोडीदार, गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड राहत असेल आणि त्याला भेटायचं असेल तर तुम्ही भेटू शकता. मात्र त्यासाठी दोन अटी आहेत. एक म्हणजे त्यांच्या नात्याला 6 महिने पूर्ण झालेले असावे आणि दुसरं म्हणजे त्यांनी आपल्या प्रेमाचे पुरावे दाखवावेत. यामध्ये लव्ह लेटर, फोटो काहीही दाखवू शकता.

मात्र ऑनलाइन रिलेशनशिपसाठी डेन्मार्कच्या सीमा खुल्या केल्या जाणार नाही. ज्यांचं प्रेम फक्त फोन, इंटरनेट किंवा पत्राद्वारे जुळलं आहे, त्यांना भेटता येणार नाही. असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.

हे वाचा - कृपया लहान मुलांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी पालकांना का दिला असा सल्ला?

डेन्मार्कच्या डेली ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन डीआरला दिलेल्या एका मुलाखतीत पोलीस अधिकारी एलेन डेगलर यांनी सांगितलं की, एखाद्या व्यक्तीसह आपलं नातं आहे, त्याचे पुरावे दाखवणं हे खूप खासगी आहे मात्र जोडीदाराला प्रवेश मिळणार की नाही हे पोलीस अधिकाऱ्यावर अवलंबून आहे.

लॉकाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं