हाफिज सईदची सुरक्षा वाढवण्याची पाकिस्तानमध्ये मागणी

हाफिजला मारण्यासाठी एका विदेशी गुप्तचर संस्थेला सुपारी देण्यात आली आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 12, 2017 01:21 PM IST

हाफिज सईदची सुरक्षा वाढवण्याची पाकिस्तानमध्ये मागणी

इस्लामाबाद, 12 नोव्हेंबर: मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज सईद याची सुरक्षा वाढवा, अशी मागणी पाकिस्तानात होते आहे. तसं पत्रच पाकिस्तानच्या गृह खात्याला पंजाब सरकारनं लिहिलं आहे.

हाफिजला मारण्यासाठी एका विदेशी गुप्तचर संस्थेला सुपारी देण्यात आली आहे. हाफिजचे पंजाबच्या राजकारणात येण्याचे काही दिवसांपासून प्रयत्न चालू आहेत.हाफीज सईदने भारताबद्दल आणि पंतप्रधान मोदींबद्दल अनेक आक्षेपार्ह विधान केली आहेत. सध्या त्याच्या जिवाला धोका आहे अशी माहिती मिळते आहे. त्याची सुरक्षा वाढवण्यात यावी, असं पत्र पंजाब प्रांताच्या गृहविभागानं पाकिस्तान सरकारला लिहिलं आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तान सरकारने हाफीज सईदला नजरकैद केली होती. आता दहशतवादाला चिथावणी देण्याच्या आरोपांवरून हाफीज सध्या लाहोरमध्ये नजरकैदेतच आहे. जमात उद दावा ही हाफिजची संघटना असून त्याच्या आडून तो दहशतवाद्यांना पूर्ण मदत करत असतो.

त्यामुळे आता पाकिस्तान सरकार काय पाऊलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 12, 2017 01:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close