खेदपूर्ण! मुस्लीम महिलेने डोक्यावर दुपट्टा घेतला म्हणून तिला विमानातून हाकलले..

खेदपूर्ण! मुस्लीम महिलेने डोक्यावर दुपट्टा घेतला म्हणून तिला विमानातून हाकलले..

अमेरिकेच्या परिवहन विभागाने तब्बल 50 हजार डॉलर म्हणजेच 35,66,275 रुपयांचा दंड लावला आहे

  • Share this:

वॉशिंग्टन, 26 जानेवारी : डेल्टा हवाई वाहतूक कंपनीवर (Delta Airlines) अमेरिकेच्या परिवहन विभागाने तब्बल 50 हजार डॉलर म्हणजेच 35,66,275 रुपयांचा दंड लावला आहे. मुस्लीम प्रवाशांना प्लेनमधून बाहेर काढल्याच्या आरोपाखाली विमान कंपनीकडून हा दंड वसूल केला जाणार आहे. भेदभाव करण्याच्या आरोपाखाली त्यांना ही शिक्षा देण्यात आली आहे. या घटनेसंदर्भातील माहिती अशी की, 26 जुलै 2016 रोजी पॅरीसच्या चार्ल्स डी  गॉल एयरपोर्टवर एक मुस्लीम दाम्पत्याला डेल्टा फ्लाइट 229 मधून बाहेर हाकलून देण्यात आले. या दोघांबाबात एक सहप्रवाशाने फ्लाइट अटेंडेंटला सांगितले की, मुस्लीम दाम्पत्यांच्या वागणुकीमुळे मला अस्वस्थ वाटत आहे. त्या मुस्लीम महिलेने डोक्यावर दुपट्टा घेतला आहे आणि पुरुषाने आपल्या घड्याळ्यात काहीतरी घातले होते. शिवाय तो पुरुष अल्लाह शब्द लिहित असल्याचे दिसले. यानंतर फ्लाइट कॅप्टनने डेल्टाच्या कॉर्पोरेट सुरक्षा रक्षकांसोबत बातचीत केली आणि मुस्लीम दाम्पत्याला बाहेर काढण्यात आले. डेल्टा विमान कंपन्यांनी नियमांचे पालन केले नाही. कथित धर्मावरुन भेदभाव करीत विमानातून हाकलून लावल्याचा विमान कंपनीवर आरोप आहे.

दुसऱ्या एका प्रकरणातदेखील 31 जुलै 2016 रोजी न्युयॉर्कच्या एम्स्टर्डमच्या विमान 49 मधून प्रवास करणाऱ्या एक मुस्लीम प्रवाशाला विमानातून बाहेर काढण्यात आले होते. आजही अशाप्रकारे धर्मावरुन वागणूक मिळणे अत्यंत दुर्देवी आहे. आधुनिक युगात वागताना, तंत्रज्ञानाच्या सान्निध्यात राहत असूनही माणसाची वैचारिक उन्नती कधी होणार हा प्रश्न आपसूक उभा राहतो. या घटना केवळ एका देशातल्या आहेत. जगभरात आजही अनेक जाती-धर्माच्या पूर्वग्रहानुसार वागणूक दिली जाते.

अन्य बातम्या

राम मंदिराची उभारणी होणार सुरू, प्रत्येक व्यक्तीमागे द्यावे लागतील इतके रुपये...

पुण्यात ‘या’ ठिकाणी मिळेल शिवभोजन थाळी

निर्भया प्रकरण : दोषी विनयने तुरुंगात केलेल्या 11 पेंटिंग्सची विक्री

First published: January 26, 2020, 4:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading