नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : अनेकवेळा ऑर्डर आपणहून कॅन्सल झाल्याचे प्रकार समोर आहे आहेत असाच एक धक्कादायक प्रकार अॅप कंपनीच्या फोनसोबत देखील झाला आहे. कोरोना आणि लॉकडाऊननंतर मोठ्या प्रमाणात ऑर्डरमध्ये फसवणूक होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. असाच एक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार डिलिव्हरी बॉयनं केल्याचं उघड झालं आहे. अॅपल स्टोरमधून 14 फोनची ऑर्डर घेऊन निघालेल्या या माणसाची नियत फिरली आणि त्यानं स्वत:च ऑर्डर कॅन्सल केली तो मोबाईल घेऊन फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 14 नोव्हेंबरला 14 नव्या आयफोनची ऑर्डर देण्यात आली होती. ही ऑर्डर एका स्टोरमधून दुसरीकडे घेऊन जात असताना त्या कर्मचाऱ्याचाला मोह आवरला नाही. त्यानं सर्व फोन स्वत:कडे ठेवले आणि ऑर्डर रद्द केली तो फरार झाला. चौकशीदरम्यान ऑर्डर रद्द करण्याचा घोळ लक्षात आला आणि संपूर्ण प्रकार समोर आला. ही घटना चीनच्या गुइयांग परिसरात हा प्रकार घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
हे वाचा-लपून-छपून उसाच्या शेतावर हत्तीचं पिल्लू मारत होतं ताव, व्यक्तीनं पाहिलं आणि...
अॅपलच्या कर्मचाऱ्यांना याची जेव्हा कल्पना आली तेव्हा त्यांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. त्याच्या जवळचे 10 iPhone 12 Pro Max चे बॉक्स देखील जप्त करण्यात आले आहेत. त्याने तीन फोन कमी किंमतींना विकल्याची देखील माहिती मिळाली आहे. पोलिसांनी चार फोन जप्त केले आहेत. या कर्मचाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं आहे.