मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Bus To London: भारतातून लंडनला पोहोचा तेही थेट बसने! 70 दिवसात फिरता येतील 18 देश

Bus To London: भारतातून लंडनला पोहोचा तेही थेट बसने! 70 दिवसात फिरता येतील 18 देश

भारत-म्यानमार सीमेवरील (India- Myanmar Border) दळणवळणाची स्थिती सामान्य झाल्यामुळे दिल्ली ते लंडन बससेवा (Delhi To London Bus Service) सुरू करणं शक्य होणार आहे

भारत-म्यानमार सीमेवरील (India- Myanmar Border) दळणवळणाची स्थिती सामान्य झाल्यामुळे दिल्ली ते लंडन बससेवा (Delhi To London Bus Service) सुरू करणं शक्य होणार आहे

भारत-म्यानमार सीमेवरील (India- Myanmar Border) दळणवळणाची स्थिती सामान्य झाल्यामुळे दिल्ली ते लंडन बससेवा (Delhi To London Bus Service) सुरू करणं शक्य होणार आहे

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी: तुम्हाला बसने परदेशात (Abroad) फिरायला जायला आवडेल का? जर होय, तर लवकरच तुमचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. वास्तविक, भारत-म्यानमार सीमेवरील (India- Myanmar Border) दळणवळणाची स्थिती सामान्य झाल्यामुळे दिल्ली ते लंडन बससेवा (Delhi To London Bus Service) सुरू करणं शक्य होणार आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये अत्याधुनिक सुविधा असलेल्या लक्झरी बसेस दिल्लीहून लंडनला रवाना होतील. मार्ग निश्चित झाल्यानंतर अॅडव्हेंचर्स ओव्हरलँडच्या 'बस टू लंडन' (Bus To London) उपक्रमांतर्गत, या बसमधून प्रवास करण्यासाठी इच्छूक लोक 70 दिवसांत सुमारे 20 हजार किलोमीटरचं अंतर कापून 18 देशांमध्ये प्रवास करून लंडनला पोहोचू शकतात. यासाठी तुम्हाला 20 हजार डॉलर म्हणजेच सुमारे 15 लाख रुपयांचं पॅकेज घ्यावं लागेल. या पॅकेजमध्ये तिकीट, व्हिसा आणि विविध देशांमधील निवास यासारख्या सर्व सेवांचा समावेश असेल. यासह 46 वर्षांनंतर ही दुसरी वेळ असेल, जेव्हा लोकांना दिल्ली ते लंडन बस सेवेचा आनंद घेण्याची संधी मिळेल. यापूर्वी एका ब्रिटिश कंपनीने 1957 मध्ये दिल्ली -लंडन- कोलकाता मार्गे - दिल्ली दरम्यान बससेवा सुरू केली होती. ही बससेवा सुरू असताना, काही वर्षांनी बसला अपघात झाला. त्यानंतर एका ब्रिटिश प्रवाशानं डबल डेकर बसची निर्मिती केली आणि पुन्हा सिडनी-भारत- लंडन दरम्यान बससेवा सुरू केली. ही सेवा 1976 पर्यंत सुरू होती. त्यावेळी इराणमधील अंतर्गत परिस्थिती आणि भारत-पाकिस्तानदरम्यान तणावाची स्थिती पाहता ही बससेवा बंद करण्यात आली होती. हे वाचा-224 कोटींच्या घरात राहून वैतागला, 16 वर्षांपूर्वी सोडलं; आता 30 कोटीत विकलं! आता मार्ग बदलला आहे आता पुन्हा एकदा भारतातील एका खासगी कंपनीने (Private Company) या दिशेनं काम सुरू केलं आहे. ज्या कारणांमुळे जुनी बससेवा बंद करण्यात आली होती ती सर्व कारणं टाळण्यासाठी बसचा जुना मार्ग बदलण्यात आला आहे. आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानऐवजी म्यानमार, थायलंड, चीन, किर्गिस्तानमार्गे ही बस फ्रान्सपर्यंत नेण्यात येणार आहे. यासोबत इंग्लिश समुद्री मार्ग (English Channel) ओलांडण्यासाठी क्रुझचाही वापर केला जाणार आहे. ही बस दिल्लीहून कोलकाता मार्गे म्यानमारला पोहोचेल. त्यानंतर थायलंड, लाओस, चीन, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, कझाकस्तान, रशिया, लॅटव्हिया, लिथुआनिया, पोलंड, चेक गणराज्य, जर्मनी, नेदरलँड, बेल्जियम आणि फ्रान्सनंतर लंडनला पोहोचेल. हे वाचा-अजब प्रकरण! वकिलाने शेजाऱ्याच्या मांजरीचं केलं अपहरण; कोर्टात पोहोचला वाद फेरी सेवेचीही घेणार मदत फ्रान्स आणि लंडनदरम्यान असलेल्या फेरी सेवेच्या (Ferry service) माध्यमातून फ्रान्समधल्या (France) कॅले येथून यूकेतील (UK) डोव्हरपर्यंत बस नेण्यात येईल आणि हा प्रवास सुमारे दोन तासांचा असेल. यानंतर बसमधील प्रवासी लंडनला रवाना होतील. बसमध्ये असणार 20 सीट्स आणि केबिन जुन्या बसप्रमाणेच नव्या बसमध्ये 20 सीट्स असतील आणि प्रत्येक प्रवाशासाठी स्वतंत्र केबिन असेल. यात खाण्या-पिण्यापासून ते झोपेपर्यंत सर्व सुविधा असतील. या बसमधून प्रवास करण्यासाठी तुमच्याकडे व्हिसासह सर्व आवश्यक कागदपत्रे असणं आवश्यक आहे.
First published:

Tags: London

पुढील बातम्या