मॉस्को 4 सप्टेंबर: भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव असतांनाच दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांची शुक्रवारी भेट झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी रशियाच्या दौऱ्यावर आहेत. चीनही या संघटनेचा सदस्या असल्याने चीनचे संरक्षणमंत्री जनरल वेइ फेंगहे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी राजनाथ सिंह यांना भेटीची वेळ मागितली होती. बैठकी आधी झालेल्या संघटनेच्या सभेत राजनाथ सिंह यांनी चीनला सुनावलं होतं.
त्यानंतर दोन्ही देशांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांसमवेत शिष्टमंडळाची भेट झाली. दोन्ही देशांच्या दरम्यान तणावाचं वातावरण असतांना आत्तापर्यंतची ही मंत्री स्तरावरची पहिलीच भेट होती.
या भेटीत तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर या आधी संघटनेच्या बैठकीत बोलतांना राजनाश सिंह यांनी चीनला खडे बोल सुनावले होते.
शांतता निर्माण करायची असल्याचं विश्वास, आक्रमणाला प्रोत्साहन न देणं, परस्पर विश्वास, आवश्यक असून त्यामुळे शांतता कायम राहू शकते असं मत व्यक्त करत त्यांनी चीनला सुनावलं होतं.
Defence Minister Rajnath Singh meeting the Chinese Defence Minister, General Fenghe in Moscow, Russia: Office of the Defence Minister pic.twitter.com/znmbUrsKtj
— ANI (@ANI) September 4, 2020
दरम्यान, चीनला लागून असलेल्या सीमेवर पुन्हा वातावरण तापलं आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने चिनी सैन्याच्या घुसखोरीचा डाव उधळून लावला होता.
सीमेवर चीनचा धोका लक्षात घेऊन भारतीय लष्करानेही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी लडाखचा दौरा करून लष्कराच्या तयारीचा आढाव घेतला.
त्यांनी सैन्य अधिकाऱ्यांची चर्चा केली आणि प्रत्येक्ष सीमेवर तैनात असलेल्या जवानांची भेट घेत त्यांचं मनोधैर्य वाढवलं.
तिकडे चिनी सैनिकांच्या हालचालीही वाढल्याचं दिसून आलं आहे. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत मात्र चीनच्या उचापती थांबलेल्या नाहीत.
गेल्या काही महिन्यांपासून भारत चीन सीमेवर तणाव असून चीनचे घुसखोरीचे प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत. भारतासोबतच शेजारच्या अनेक देशांमध्ये चीनने सीमेवरचा वाद उकरून काढून आगळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
चीन काय करू शकतो याचा अंदाज घेत भारताने सर्व तयारी सुरु केल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Rajnath singh