कृषी कायद्याविरोधात आंदोलनात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, खलिस्तानी झेंडे फडकले

कृषी कायद्याविरोधात आंदोलनात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, खलिस्तानी झेंडे फडकले

या घटनेचा संतापजनक एक व्हिडीओ समोर आला आहे. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ शीख बांधवांनी जोरदार निदर्शनं केली आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 13 डिसेंबर : कृषी कायद्याविरोधात गेल्या 15 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन (farmers protest) सुरू आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये कृषी कायद्याविरोधात शीख बांधवांनी आंदोलन केले आहे. या आंदोलनादरम्यान महात्मा गांधींच्या पुतळ्याची विंटबन झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसंच घटनास्थळावर खलिस्तानी झेंडेही आढळले आहे.

या घटनेचा संतापजनक एक व्हिडीओ समोर आला आहे. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ शीख बांधवांनी जोरदार निदर्शनं केली आहे. यावेळी आंदोलकांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला आहे. एवढंच नाहीतर महात्मा गांधींचा पुतळाही झाकून टाकला आहे.

यावेळी आंदोलकांकडे खलिस्तानी झेंडे सुद्धा पाहण्यास मिळाले आहे.  ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील भारतीय दुतावासाने मेट्रोपॉलिटन आणि नॅशनल पार्क पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेबद्दल उपसचिव स्टीफन बीगन यांनी माफी मागितली आहे. याआधीही लंडनमध्ये भारतीय उच्च आयोगाच्या बाहेर शीख बांधवांनी निदर्शनं केली होती. त्यावेळीही खलिस्तानी झेंडे दाखवण्यात आले होते.

दरम्यान, दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोनल सुरूच आहे. या आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नाही. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी 'नवीन कृषी कायद्यामुळे शेती आणि त्यासंबंधातील विभागातील अडथळा दूर होईल. या नव्या कायद्यामुळे शेतकऱ्यांसाठी नवीन बाजारपेठा उपलब्ध होईल. सध्या भारतीय शेतकरी स्वत:चे उत्पादन बाजारात आणि बाहेरही विकू शकतो. याशिवाय विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवरदेखील ते आपले उत्पादनाची विक्री करू शकतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे व त्यांना अधिक समृद्ध करण्यासाठी आम्ही विविध प्रकारच्या योजना राबवित आहोत.' असा विश्वास व्यक्त केला.

Published by: sachin Salve
First published: December 13, 2020, 10:33 AM IST
Tags:

ताज्या बातम्या