S M L

न्यूयॉर्कच्या न्यायाधीशपदी मराठमोळ्या दीपा आंबेकर

आंबेकर न्यूयॉर्कमधील पहिल्याच मराठी, तर तिसऱ्या भारतीय महिला न्यायाधीश ठरल्या आहेत. त्यांच्या या यशामुळे प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 5, 2018 11:46 AM IST

न्यूयॉर्कच्या न्यायाधीशपदी मराठमोळ्या दीपा आंबेकर

05 मे : न्यूयॉर्क शहरातील दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशपदी दीपा आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आंबेकर न्यूयॉर्कमधील पहिल्याच मराठी, तर तिसऱ्या भारतीय महिला न्यायाधीश ठरल्या आहेत. त्यांच्या या यशामुळे प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावली आहे.

दीपा आंबेकर या अमेरिकेत स्थानिक झालेल्या प्रज्ञा आणि सुधीर आंबेकर यांच्या कनिष्ठ कन्या आहे. आणि पुण्यातील मान्यवर डॉ. उप्रेंद वडगावकर यांच्या त्या नात आहेत. लॉ फार्ममधील लठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्याहून ७० टक्के कमी वेतन स्वीकारुन त्यांनी लीगल एड्स सोसायटीसाठी काम सुरु केले.

ज्यांच्याकडे वकिलांना देण्यासाठी पैसा नाही, अशा २ हजार गरजूंच्या बाजूने दीपांनी खटले लढविले. त्यानंतर त्यांनी न्यूयॉर्क सिटी कौन्सिल येथे सिनियर लेजिस्लेटिव्ह कौन्सल वरिष्ठ विधान वकील हे पद मिळवून आपला न्यायव्यवस्थेचा अनुभव अधिक विस्तृत केला

न्यूयॉर्कचे महापौर बिल डे ब्लासिओ यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात दीपा आंबेकर यांच्या नियुक्तीची माहिती देण्यात आली आहे. दीपा आंबेकर यांची दिवाणी न्यायालयात नियुक्ती करण्यात आली असून, त्या फौजदारी न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहतील.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2018 11:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close