मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

भूत बंगल्यात शिरताच तरुणाचा मृत्यू, काय खरं नी काय खोटं? रंगली चर्चा

भूत बंगल्यात शिरताच तरुणाचा मृत्यू, काय खरं नी काय खोटं? रंगली चर्चा

धाडसाने तो भूत बंगल्यात शिरला खरा, मात्र पुढं जे काही घडलं ते पाहता अनेक प्रश्न निर्माण झाले.

धाडसाने तो भूत बंगल्यात शिरला खरा, मात्र पुढं जे काही घडलं ते पाहता अनेक प्रश्न निर्माण झाले.

धाडसाने तो भूत बंगल्यात शिरला खरा, मात्र पुढं जे काही घडलं ते पाहता अनेक प्रश्न निर्माण झाले.

  • Published by:  desk news

मलेशिया, 7 डिसेंबर: एक तरुण त्याच्या मित्रासोबत (Haunted place) भूत बंगल्यात शिरल्यानंतर काही क्षणांतच त्याचा मृत्यू झाल्यामुळे (Death at ghost bungalow) उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. भूत बंगला आणि त्याच्याशी निगडीत अनेक दंतकथा लोकांमध्ये (Stories of ghost) प्रसिद्ध आहेत. भारतासह जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये भूत आणि चेटकीण (Death due to heart attack) यांच्या रंजक कथा ऐकवल्या जातात. प्रत्यक्षात भूत असतं का आणि ते माणसाचा जीव घेतं का, याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम असतात. काही घटना हे संभ्रम दूर करतात, तर काही घटना हा संभ्रम वाढवताना दिसतात.

तरुणाने केलं धाडस

मलेशियात राहणाऱ्या बेनटॉंग नावाच्या तरुणानं त्याच्या मित्रासोबत भूतबंगल्यात शिरण्याचा प्लॅन आखला होता. 1 डिसेंबर रोजी त्याने या वास्तूत प्रवेश केला. या बंगल्याविषयी अनेकदा अनेकांनी वेगवेगळ्या आख्यायिक आखल्या होत्या. मात्र या सर्व भाकडकथा असून त्याच्यावर तरुणाचा बिलकूल विश्वास नव्हता. स्वतः भूतबंगल्यात जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या इराद्याने त्याने मित्रासह तिथे प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

बंगल्यात शिरताच कोसळला तरुण

बंगल्यात शिरताच तरूणाला चक्कर यायला सुरुवात झाली. त्याचा श्वास रोखला गेला आणि तो जागेवरच कोसळला. त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी तातडीनं दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या हार्ट अटॅकनं त्याचा बळी गेल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

हे वाचा- हिवाळ्यात मेथीच्या पराठ्यांचा नाश्ता सर्वोत्तम, पुरुषांना होईल जबरदस्त फायदा

भीतीमुळे अटॅक?

तरुणाला भूत बंगल्यात शिरत असल्याची कदाचित प्रचंड भीती वाटत असावी, असं डॉक्टरांचं मत आहे. सामान्यतः प्रचंड भीती वाटली तरी त्यामुळे हार्ट अटॅक येण्याच्या घटना दुर्मिळ असतात. या तरुणाची प्रकृतीदेखील उत्तम होती. मात्र तरीही काही दुर्मिळ प्रसंगांमध्ये अशा प्रकारचे हार्ट अटॅक येऊ शकतो, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. अशा घटनांमुळे लोकांचा भूताखेतांच्या गोष्टीवरील विश्वास वाढत असून त्याचा परिणाम अंधश्रद्धा वाढण्यावर होत असल्याचं अनेकजण सांगतात.

First published:

Tags: Death, Heart Attack