मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

बापरे! Five Star हॉटेलमध्ये कुटुंबाचा मृत्यू, एका तासात झालं ‘होत्याचं नव्हतं’

बापरे! Five Star हॉटेलमध्ये कुटुंबाचा मृत्यू, एका तासात झालं ‘होत्याचं नव्हतं’

एका अलिशान, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका कुटुंबाचा मृत्यू झाल्याची घटना (Death of a family in five star hotel) नुकतीच समोर आली आहे.

एका अलिशान, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका कुटुंबाचा मृत्यू झाल्याची घटना (Death of a family in five star hotel) नुकतीच समोर आली आहे.

एका अलिशान, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका कुटुंबाचा मृत्यू झाल्याची घटना (Death of a family in five star hotel) नुकतीच समोर आली आहे.

  • Published by:  desk news

मॉस्को, 18 ऑक्टोबर : एका अलिशान, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका कुटुंबाचा मृत्यू झाल्याची घटना (Death of a family in five star hotel) नुकतीच समोर आली आहे. कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हे कुटुंब बाहेर पडलं होतं. त्यावेळी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरण्याचा (Stay in five star hotel) त्यांनी निर्णय घेतला. मात्र हॉटेलच्या अलिशान आणि आरामदायक रुममध्ये (Death in hotel room) प्रवेश करताना पुढच्या तासाभरात आपला मृत्यू होईल, याची त्यांना पुसटशी कल्पनादेखील आली नव्हती.

मिळाली सौना रूम

रशियाच्या मॉस्कोचे रहिवासी असणारे सर्जी बुरेनकॉव, त्यांची पत्नी नेटैल्या, त्यांची 31 वर्षांची मुलगी काट्या आणि तिची पार्टनर निकीता असे चौघे सुट्टीसाठी अलबेनियाला गेले. तिथल्या ग्लोरिया पॅलेस या अलिशान फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्यांनी बुकिंग केलं होतं. गेल्यानंतर हॉटेलच्या व्यवस्थापनानं त्यांना हॉटेलमधील सर्वात अलिशान असणारी सौना रुम दिली. लांबच्या प्रवासानं थकलेल्या कुटुंबानं रुममध्ये प्रवेश केला आणि फ्रेश होऊन गादीवर अंग टाकलं.

व्हेटिलेशन सिस्टिम कोलमडली

या रुममध्ये वातानुकुलनासाठी कुठलाही नैसर्गिक व्यवस्था नव्हती. एअर कंडिशनर आणि इतर तांत्रिक बाबींच्या मदतीनं रुममधील हवा आणि तापमान नियंत्रित केलं जात होतं. या कुटुंबाला झोप लागल्यानंतर अचानक ही यंत्रणा बंद पडली. त्यामुळे झोपेतच गुदमरून चौघांचाही मृत्यू झाला. जेव्हा वेटर या रुममध्ये आला, तेव्हा डोअर बेल वाजवून कुणी दार उघडत नसल्याचं त्याला समजलं. त्यानंतर थोडा वेळाने पुन्हा प्रयत्न करूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने दरवाजाची किल्ली वापरून आत प्रवेश केला. समोर दिसणारं दृश्य पाहून त्याला जबर धक्का बसला. एका तासापूर्वीच त्याने कुटुंबाशी गप्पा मारल्या होत्या.

हे वाचा- ‘ही’ अट पूर्ण नसेल, तर किराणाही मिळणार नाही! जर्मनीत नवा नियम

चौघांचाही झाला मृत्यू

या रुममध्ये राहणारे चौघेही मृत्युमुखी पडले होते. चौघांचाही झोपेतच मृत्यू झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. वेटरने ताबडतोब व्यवस्थापनाला याची माहिती दिली. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिले आहेत. या घटनेमुळे फाईव्ह स्टार हॉटेलच्या कृत्रिम यंत्रणेवर वातानुकूलन अवलंबून असलेल्या रुममध्ये राहणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. एका सुखी परिवाराचा असा करुण अंत झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

First published:

Tags: FAMILY, Russia