Home /News /videsh /

प्रिय सांता, तू तरी...समलैंगिक मुलाचं भावुक पत्र; वाचताना अंगावर काटा येईल

प्रिय सांता, तू तरी...समलैंगिक मुलाचं भावुक पत्र; वाचताना अंगावर काटा येईल

नुकतेच एक चिट्ठी समोर आली असून यामध्ये समलैंगिक मुलाने केलेल्या मागणीने अनेकजण इमोशनल झाले आहेत.

    मुंबई, 28 नोव्हेंबर : नाताळचा सण जवळ आला आहे. यादरम्यान सांताक्लॉजकडे अनेकजण चिट्ठी लिहून गिफ्ट आणि चॉकलेट मागत असतात. यामध्ये काहीजण खूपच वेगळ्याच गोष्टींची देखील मागणी करतात. या गोष्टी पाहून तुम्ही बुचकळ्यात पडू शकता. नुकतेच एक चिट्ठी समोर आली असून यामध्ये समलैंगिक मुलाने केलेल्या मागणीने अनेकजण इमोशनल झाले आहेत. या मुलाने आपल्या या कार्डमध्ये लिहिले आहे, प्रिय सांता, तुम्ही एलजीबीटीक्यू समूहाचे समर्थन करता का? जर करत असाल तर देवाला सांगा की मी त्याच्यावर खूप प्रेम करतो. मी समलैंगिक असताना देखील ते माझ्यावर प्रेम करतात का ?धन्यवाद,  तुमचाच विल. हे पत्र नॅन्सी क्रूज गार्सिया हिने ट्विटरवर शेअर केले असून या मुलाने लिहिलेल्या पत्रामुळे मी खूप इमोशनल झाले असून हा खूपच हुशार मुलगा असल्याचे तिने म्हटले आहे. चिठ्ठीवरून इंटरनेटवर वाद या मुलाने लिहिलेल्या चिठ्ठीवरून इंटरनेटवर वादाला सुरुवात झाली आहे. नॅन्सीच्या या ट्विटला 27 हजारांहून आधिक लोकांनी रिट्विट केले असून LGBTQ समुदायाशी भेदभाव का केला जातो हा प्रश्न उद्भवला आहे. 2 लाख लोकांनी ही पोस्ट लाईकदेखील केली आहे. तर अनेकजणांनी विलबरोबरच अन्य ट्विट देखील शेअर केले आहेत. काहीजणांनी हे खूपच वेगळे कार्ड असल्याचे म्हटले आहे. यामध्ये त्याचे दुःख दिसून येत आहे. तर एकाने ही चिट्ठी वाचून मला रडू आल्याचं म्हटले आहे. हे ही वाचा-वर्क फ्रॉम होम की वर्क फ्रॉम ऑफिस? 83% भारतीय म्हणतात... विविध लोकांची वेगवेगळी मते नॅन्सीने ट्विट केल्यानंतर त्याच्यावर विविध लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी म्हटले आहे, ही मुले खूप स्पेशल असून यामध्ये त्यांची काहीही चूक नाही. आई वडिलांनी त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे. तर एकाने कुटुंबातील व्यक्ती देखील यासाठी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. काहीजण यांच्याशी वाईट व्यवहार करतात तर काही कुटुंबीय त्यांच्याशी संबंध तोडून टाकतात असे म्हटले आहे. विविध देशांमध्ये यासाठी कायदा असून काही देशांमध्ये हे संबंध कायदेशीर आहेत तर काही देशामध्ये यासाठी शिक्षा देखील आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: China

    पुढील बातम्या