जपानमधल्या पुरामध्ये मृतांची संख्या 179वर, भूस्खलनाने हाहाकार

News18 Lokmat | Updated On: Jul 11, 2018 09:05 AM IST

जपानमधल्या पुरामध्ये मृतांची संख्या 179वर, भूस्खलनाने हाहाकार

जपान, 11 जुलै : जपानमध्ये आलेल्या पुरात मृतांची संख्या आता 179वर गेली आहे. 20 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पण या भीषण पुरामुळे जपानमध्ये मोठी जीवितहानी आणि आर्थिक नुकसान झालं आहे.

हिरोशिमा आणि ओकायामा भागांमध्ये 4 दिवसांपासून मोठा पूर आला आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनही झालं आहे.

ओकायामामधील एक निवासी क्षेत्र मोठ्या तळ्यासारखं दिसत आहे. तो संपूर्ण परिसर पाण्याखाली बुडाला आहे.

चिखलाच्या ढिगाऱ्यात वाहून गेल्यानंही अनेकांचा मृत्यू झाला आहे. या पुरामध्ये अजूनही शेकडो जण अडकल्याची भीती आहे.

या पुरातून सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी जवळपास 70 हजार आपात्कालीन सेवेचे कर्मचारी बचावकार्यात जुंपले आहेत. पण पुराचा आवाका आणि तडाखा इतका भयानक आहे की मनुष्यबळ अपुरं पडलं आहे.

Loading...

जपानमधील जमीन, इन्फ्रास्ट्रक्चर, वाहतूक आणि पर्यटन मंत्रालयानुसार, सगळे रेकॉर्ड तोजणाऱ्या या पुरामुळे 47 पैकी 28 प्रांतात भूस्खलन होऊन भौगोलिक नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आह.

जपान सरकारने परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत पंतप्रधानांच्या कार्यालयात आपातकालीन व्यवस्थापन केंद्र स्थापन केले आहे.

या नैसर्गिक आपत्तीमुळे शेकडो लोक जखमी झाले आहेत आणि असंख्य घरं उद्धस्त झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2018 09:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...