कॅनडा 30 मे: एका शाळेमध्ये 215 लहान मुलांचे मृतदेह (Dead Bodies of Children Found in School) आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. यातील काही मुलांचं वय अवघं तीन वर्ष आहे. ही घटना कॅनडामधील आहे. संबंधित शाळा ही एकेकाळी कॅनडामधील सर्वात मोठं विद्यालय समजलं जात. ब्रिटीश कोलंबियाच्या सैलिश भाषा बोलणाऱ्या एका समूहाच्या फर्स्ट नेशनचे प्रमुख कोसेन कॅसमिर यांनी एका म्हटलं, की जमिनीच्या आतमध्ये असणाऱ्या वस्तूंचा शोध घेणाऱ्या रडारच्या मदतीनं मागील आठवड्यात हे मृतदेह आढळून आले.
कॅसमिर यांनी शुक्रवारी सांगितलं, की याठिकाणी आणखी मृतदेह आढळू शकतात. कारण, शाळेच्या मैदानाची आणि इतर काही भागांची पाहणी अद्याप बाकी आहे. या मृतदेहांबाबत कधीही कल्पना केली नव्हती आणि शाळेकडूनही याची कोणतीही नोंद झालेली नाही.
19 व्या शतकापासून 1970 च्या दशकापर्यंत फर्स्ट नेशनच्या दीड लाखाहून अधिक मुलांना शासकीय अनुदानीत ख्रिश्चन शाळांमध्ये शिक्षण घ्यावं लागत असे. त्यांचे धर्मपरिवर्तन करुन ख्रिश्चन धर्मात बदलण्यास भाग पाडले जात, तसंच आपली मातृभाषा बोलण्याची परवानगी त्यांना नव्हती. अनेक मुलांना मारहाण केली जात असे तसंच शिवीगाळही केली जात. इतंकच नाही तर असंही सांगितलं जातं, की यादरम्यान 6,000 मुलांचा मृत्यूही झाला होता.
कॅनडाच्या सरकारनं 2008 मध्ये याबाबत माफीही मागितली होती आणि शाळांमधील शारिरीक तसंच लैंगिक शोषणांचे आरोपही मान्य केले होते. ब्रिटिश कोलंबियाचे प्रमुख नेता जॉन होगर्न म्हणाले, की या मृतदेहांबाबतची माहिती मिळाल्यापासून ते घाबरले आहेत आणि त्यांना मोठा धक्का बसला आहे. संबंधित शाळा 1978 मध्ये बंद झालेली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Dead body, School