दाऊद पाकिस्तानतच; ब्रिटन सरकारने जाहीर केले कराचीतले 3 पत्ते

ब्रिटनने जाहीर केलेल्या फायनॅनशिअल सॅंक्शन टार्गेट लिस्टमधील दाऊदचे तिन्ही पत्ते कराचीमधील असल्यामुळे तो पाकिस्तानातच असल्याच्या बातमीला पुष्टी मिळाली आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2017 12:47 PM IST

दाऊद पाकिस्तानतच; ब्रिटन सरकारने जाहीर केले कराचीतले 3 पत्ते

कराची, 23 ऑगस्ट: 1993 मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी आणि कुख्यात गुन्हेगार  दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच असल्याचं पुन्हा स्पष्ट झालं आहे.   ब्रिटनने जाहीर केलेल्या फायनॅनशिअल सॅंक्शन टार्गेट लिस्टमधील दाऊदचे  तिन्ही पत्ते कराचीमधील  असल्यामुळे तो पाकिस्तानातच असल्याच्या बातमीला पुष्टी मिळाली आहे.

ब्रिटनच्या ट्रेझरी  विभागाने ज्यांच्या मालमत्तेवर टाच आणलीय अशा लोकांची एक यादी जाहीर केली आहे. या यादीत दाऊदच्या पाकिस्तानातल्या तीन पत्त्यांचाही आणि 21 खोट्या नावांचा समावेश आहे. हे तिन्ही पत्ते कराचीतले आहेत. या लिस्टमध्ये नाव आल्यामुळे दाऊदच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. सीएनएन न्यूज 18 नं यापूर्वी दिलेल्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे. दाऊद कराचीतच असल्याचं दाऊदला केलेल्या दूरध्वनीतून स्पष्ट झालं होतं. त्यामुळे दाऊद पाकिस्तानमध्ये नसल्याचा पाकिस्तानकडून केला जाणारा दावा खोटा असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.

दाऊदचे कराचीतले तीन पत्ते

-हाऊस नंबर ३७, ३० वा स्ट्रीट, डिफेन्स हाऊसिंग ऑथरिटी, कराची,

-  नूराबाद, कराची

Loading...

-व्हाईट हाऊस, सौदी मशिदीजवळ, क्लिफ्टन, कराची.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2017 11:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...