मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

हा ऐका अंडरवर्ल्ड डाॅन दाऊदचा खरा आवाज,खुद्द दाऊदच होता फोनवर !

हा ऐका अंडरवर्ल्ड डाॅन दाऊदचा खरा आवाज,खुद्द दाऊदच होता फोनवर !

 मुंबईच नाही तर देशाचा शत्रू नंबर 1 असलेल्या दाऊद इब्राहिमचा. तुम्ही नीट ऐकलंय हा आवाज पहिल्यांदा टेलिव्हीजनवर तुम्ही ऐकताय तो आयबीएन लोकमतवर.

10 ऑगस्ट: हा आवाज आहे अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहीम कासकरचा. फक्त मुंबईच नाही तर देशाचा शत्रू नंबर 1 असलेल्या दाऊद इब्राहिमचा. तुम्ही नीट ऐकलंय हा आवाज पहिल्यांदा टेलिव्हीजनवर तुम्ही ऐकताय तो आयबीएन लोकमतवर. दाऊदचा हा आवाज सरकारी यंत्रणांनी टॅप केलेल्या टेपमधून घेतलेला नाही. हा आवाज आम्ही म्हणजेच नेटवर्क 18 ने मिळवलाय. त्यासाठी आम्ही दाऊदला डायरेक्ट फोन केला आणि तो फोन दाऊदनं स्वत: उचलला. या अगोदर आम्ही तुम्हाला अनेक वेळेस दाखवलंय की दाऊद हा कराचीत कुठं राहतो आणि कसा राहतो ते. आमचे प्रतिनिधी मनोज गुप्तांनी दाऊदला फोन केल्यानंतर खुद्द दाऊद पलिकडून फोनवर म्हणाला 'हॅलो...आप कोन' आमच्या प्रतिनिधीने नाव सांगताच फोन  चोटानी याच्याकडे दिला आणि त्याने दाऊदची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. दाऊदचाच हा आवाज असल्याचं शिक्कामोर्तब सुरक्षा यंत्रणांमध्ये आतापर्यंत काम करणाऱ्या टॉपच्या अधिकाऱ्यांनी केलंय. दाऊदचा हा आवाज कदाचित तुम्ही पहिल्यांदा आयबीएन लोकमतवर ऐकतायत. दाऊद पाकिस्तानमध्ये नसल्याचा दावा पाक सरकारनं अनेक वेळेस केलाय. पण दाऊदचा हा आम्ही मिळवलेला आवाज पाकिस्तानला उघडं पाडणारा आहे. अनेक महिने आम्ही दाऊदला ट्रॅक करत होतो. आणि शेवटी त्याला डायरेक्ट फोन केल्यानंतर असा सापडला. फोनवर बोलताना दाऊद का दचकला ? आमच्या प्रतिनिधीनं त्याला नाव सांगितल्यानंतर दाऊदचा आवाज काही क्षण थांबला. त्याने एक मोठा पाॅज घेतला आणि  तोच फोन आपला साथीदार चोटानीकडे दिला. चोटानी हा दाऊदचं जगभरातलं बेटिंगचं साम्राज्य सांभाळत असल्याचं बोललं जातंय. हा आवाज दाऊदचाच असल्याची पुष्टीही आम्ही केली आहे. दरम्यान, दाऊद इब्राहिम 1993च्या मुंबई बाॅम्बस्फोटांचा प्रमुख आरोपी असून सध्या तो फरार आहे. या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात असून लवकरच याचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर दाऊद पाकिस्तानात राहत असल्याचा हा एकमेव  पुरावा न्यूज 18 ने जगासमोर आणला आहे.
First published:

Tags: Dawood ibrahim, दाऊद इब्राहिम

पुढील बातम्या