मराठी बातम्या /बातम्या /विदेश /बॉयफ्रेंडसोबत सेक्स करताना चिमुकलीनं केलं Disturb; आईकडून 3 वर्षाच्या मुलीची हत्या

बॉयफ्रेंडसोबत सेक्स करताना चिमुकलीनं केलं Disturb; आईकडून 3 वर्षाच्या मुलीची हत्या


बॉयफ्रेंडसोबत सेक्स करताना व्यत्यय आणल्यानं एका आईनं आपल्या तीन वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या केली आहे. (PC-Tiktok)

बॉयफ्रेंडसोबत सेक्स करताना व्यत्यय आणल्यानं एका आईनं आपल्या तीन वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या केली आहे. (PC-Tiktok)

बॉयफ्रेंडसोबत सेक्स करताना व्यत्यय (Disturbed While Having Sex With Boyfriend) आणल्यानं एका आईनं आपल्या तीन वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या (Mother Murdered Daughter) केली आहे.

बर्मिंघम, 11 ऑगस्ट: आई आणि बाळाचं नातं हे जगातील सर्वात महान नातं मानलं जातं. आपल्या बाळासाठी आईनं आपला जीवही द्यायला तयार असते. पण आई आणि बाळाच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. बॉयफ्रेंडसोबत सेक्स करताना व्यत्यय (Disturbed While Having Sex With Boyfriend) आणल्यानं एका आईनं आपल्या तीन वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या (Mother Murdered Daughter) केली आहे. याप्रकरणी न्यायालयानं आरोपी आईसह तिच्या प्रियकराला 15 वर्षांचा तुरुंगवास (15 years of Imprisonment) सुनावला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित घटना ब्रिटनमधील बर्मिंघम येथील आहे. गेल्यावर्षी 9 ऑगस्ट रोजी आरोपी आई निकोला प्राइस्टनं आपल्या 3 वर्षीय चिमुकलीची हत्या केली होती. त्यानंतर आता बर्मिंघम क्राउन कोर्टानं आरोपी आईसह तिच्या प्रियकराला दोषी ठरवलं आहे. चिमुकलीच्या हत्येप्रकरणी न्यायालयानं आरोपी आईसह तिच्या प्रियकराला 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा-VIDEO: फेरे घेतानाच लागत होती नवरीच्या लेहंग्याला आग; नवरदेवानं जे केलं ते...

नेमकं प्रकरण काय आहे?

गेल्या वर्षी 8 ऑगस्ट रोजी आरोपी आई निकोला प्राइस्ट आणि तिचा प्रियकर कॅलम रेडफर्न यांना सेक्स करायचा होता. त्यासाठी प्रियकर कॅलम निकोलाच्या घरी आला होता. दरम्यान तीन वर्षांची चिमुकली झोपेतून उठून खेळण्यासाठी हट्ट करत होती. यामुळे नाराज झालेल्या आईनं रात्री आपल्या 3 वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण केली. मारहाणीसाठी आरोपी प्रियकरानं देखील निकोलाची साथ दिली. दोघांनी केलेल्या मारहाणीत चिमुकलीनं जागीच जीव सोडला.

हेही वाचा-VIDEO : वडिलांनीच फुग्यासह मुलीला हवेत सोडलं; पाहूनच चुकला आईच्या हृदयाचा ठोका

मारहाण केल्यानंतर घाबरलेली आई निकोलानं हेल्पलाइनवर फोन करून माहिती दिली. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. द सननं दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी आई निकोलानं बरोबर एक महिन्यानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिला आपल्या मुलीची हत्या केल्यामुळे पश्चाताप होतं होता. शरमेनं तिची मान झुकली होती, डोळ्यात पाणी आलं होतं. पण चिमुकलीला केलेल्या मारहाणीत तिची शरीरातील अनेक हाडं तुटल्याचं शवविच्छेदन अहवालात समोर आलं होतं.

First published:
top videos

    Tags: Britain, Crime news, Murder