'या' फोटोंसाठी मिळाला दानिश सिद्दीकींना 'पुलित्झर' पुरस्कार!

पत्रकारितेतला नोबेल समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार मुंबईतले फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकींना जाहीर झालाय

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2018 08:19 PM IST

'या' फोटोंसाठी मिळाला दानिश सिद्दीकींना 'पुलित्झर' पुरस्कार!

मुंबई,ता.18 एप्रिल: पत्रकारितेतला नोबेल समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार मुंबईतले फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकींना जाहीर झालाय. दानिश हे मुंबईत आंतरराष्ट्रीय न्यूज एजन्सी रॉटर्ससाठी काम करतात.

दानिश यांनी रोहिंग्या निर्वासितांचे फोटो काढून त्यातून त्याचं जीवन जगासमोर मांडला. फिचर फोटोग्राफी विभागात त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

त्यांनी दक्षिण आशीया, मध्यपूर्वेतलं संकट, अफगाणिस्तान आणि इराकमधलं युद्ध, रोहिंग्या निर्वासितांचा मुद्दा, नेपाळमध्ये आलेला विनाशकारी भूकंप या सारख्या अनेक महत्वाच्या घटनांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय.

पत्रकारिता, साहित्य आणि संगित या क्षेत्रात जागतिक पातळीवर उल्लेखनिय काम करणाऱ्यांना 1917 पासून हा पुरस्कार देण्यात येतो.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 18, 2018 08:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close