डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवाला धोका? व्हाइट हाऊसमध्ये आलेल्या पॅकेटमधून निघालं घातक विष

डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवाला धोका? व्हाइट हाऊसमध्ये आलेल्या पॅकेटमधून निघालं घातक विष

एकीकडे ट्रम्प यांच्या जीवाला धोका असताना दुसरीकडे अमेरिका आणि चीनमध्ये पेटलेला वाद आणखी चिघळत चालला आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 20 सप्टेंबर : कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठविलेल्या संशयास्पद पॅकेटमध्ये घातक विष असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी या पॅकेटमध्ये ricin असल्याची माहिती दोन परीक्षणातून मिळाली आहे. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवाला धोका असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

व्हाइट हाऊसमध्ये पोहोचण्यापूर्वी सर्व पत्रांची व वस्तूंची तपासणी केली जाते. अमेरिका कायदा अंमलबजावणीच्या एका अधिकाऱ्याने अमेरिका केबल नेटवर्कला सांगितले की, तपासकर्ते या पॅकेटचा तपास करीत असून हे कॅनडामधून आल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रिकिन कॅस्टर बीन्सपासून तयार केला जाणारा अत्यंत विषारी पदार्थ असून याचा उपयोग दहशतवादी हल्ल्यासाठी केला जातो. याचा उपयोग पावडर, गोळी वा अॅसिडच्या स्वरुपात केला जातो. जर कोणी हे विष घेतलं तर उलट्या व अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो.

हे ही वाचा-पाकिस्तानचा पुन्हा खोडसाळपणा; चुकीचा नकाशा दाखवल्याने अजित डोवल संतापले

विभागीय तपास ब्युरो (FBI) आणि सिक्रेट सर्व्हिस या प्रकरणाचा तपास करीत आहे. एफबीआयने वॉशिंग्टन फील्ड कार्यालयाने केलेल्या वक्तव्यानुसार, एफबीआय आणि आमची अमेरिकेतील गुप्त सेवा, अमेरिका पोस्ट निरीक्षण सेवा अमेरिका सरकारला आलेल्या मेलवरील एका संदिग्ध पत्रावर तपास करीत आहे. यावेळी सार्वजनिक सुरक्षेसाठी कोणताही धोका नाही.

दरम्यान, अमेरिका आणि चीनमध्ये पेटलेला वाद आणखी चिघळत चालला आहे. याच दरम्यान रशियानेही आपल्या सैनिकांचा फौज फाटा हा सीमेवर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू यांनी स्पष्ट केलं की, 'दोन मोठ्या राष्ट्रांमध्ये तणाव वाढत चालला आहे. त्यामुळे रशियाच्या हद्दीत तणावही वाढला आहे. आमच्या सुरक्षा यंत्रणेनं दिलेल्या माहितीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्व चीन सागर स्थित रशियाचे नौदल बेसवर व्लादिवोस्तोकवर सैनिकांची संख्या वाढवण्यात येणार आहे. याच बेसवरून प्रशांत महासागर, पूर्वी चीन सागर आणि फिलिपाईन्स खाडी क्षेत्रात नजर ठेवता येईल.'

Published by: Meenal Gangurde
First published: September 20, 2020, 11:06 AM IST

ताज्या बातम्या