दलवीर भंडारींची आंतरराष्ट्रीय कोर्टात न्यायाधीशपदी दुसऱ्यांदा निवड

दलवीर भंडारींची आंतरराष्ट्रीय कोर्टात न्यायाधीशपदी दुसऱ्यांदा निवड

या विजयामुळे भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील स्थान अधिकच बळकट झालं आहे.आंतराष्ट्रीय कोर्टाची स्थापना 1945 साली झाली होती. त्याच्या न्यायाधिशांची दर तीन वर्षांनी निवडणूक होत असते

  • Share this:

21 नोव्हेंबर: आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या न्यायाधीशपदी भारताच्या दलवीर भंडारींची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांना मिळणारा पाठिंबा पाहता ब्रिटीश उमेदवाराने  ऐन वेळी माघार घेतली.

या विजयामुळे भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील स्थान अधिकच बळकट झालं आहे.आंतराष्ट्रीय कोर्टाची स्थापना 1945 साली झाली होती. त्याच्या न्यायाधिशांची दर तीन वर्षांनी निवडणूक होत असते. आतापर्यंत या कोर्टात कमीत कमी एक तरी ब्रिटीश न्यायाधीश असायचा.या विजयमुळे मात्र आता पहिल्यांदाच अंतरराष्ट्रीय न्यायालयात एकही ब्रिटीश न्यायाधीश नसणार आहे.न्यायाधीश भंडारी यांना जनरल असेंबलीतील 193 पैकी 183 मत मिळाली तर सेक्युरिटी काउन्सिलमधील  15 पैकी 15 मत मिळाली. या विजयाबद्दल हा नव्या उभरत्या भारताचा विजय आहे असं विधान संयुक्त राष्ट्रसंघाचे भारताचे कायम स्वरूपी सदस्य सैद अकबरूद्दीन यांनी केलं आहे. या विजयासाठी पंतप्रधान मोदींनी सुषमा स्वराज आणि भंडारी दोघांचंही अभिनंदन केलं आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयातील या विजयानंतर  आता संयुक्त राष्ट्रसंघात भारताची परिस्थिती कशी मजबूत होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2017 01:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading