Home /News /videsh /

जाणीवपूर्वक Corona infected झालेल्या गायिकेचा मृत्यू, पास मिळवण्यासाठी मुद्दाम झाली होती Positive

जाणीवपूर्वक Corona infected झालेल्या गायिकेचा मृत्यू, पास मिळवण्यासाठी मुद्दाम झाली होती Positive

देशात सर्वत्र फिरता येण्यासाठी एकदा आपल्याला कोरोना होऊन जावा आणि ‘कोरोना पास’ मिळावा, यासाठी तिने जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह होण्याचा निर्णय घेतला. मात्र यातच तिचा मृत्यू झाला.

    चेक रिपब्लिक, 19 जानेवारी: चेक रिपब्लिक (Czech Republic) या देशातील प्रसिद्ध गायिका (Famous folk singer) हना होर्काचा (Hana Horka) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे तिने जाणीवपूर्वक स्वतःला कोरोना पॉझिटीव्ह (Delibarately corona positive) करून घेतलं होतं. शिवाय हना होर्कानं कोरोना प्रतिबंधक लसीचा (No vaccine) एकही डोस घेतला नसल्याचं दिसून आलं आहे. कोरोना संसर्गातून आपण बरे होत असल्याचंही तिने सोशल मीडियातून जाहीर केलं होतं. मात्र अचानक तिची तब्येत बिघडली आणि तिला मृत्यू झाला.  स्वतःच झाली कोरोना पॉझिटीव्ह कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 57 वर्षांच्या हनाचा मुलगा जॅन रेक आणि त्याच्या वडिलांना काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. त्यावेळी आपण आपल्या आईला आपल्यापासून वेगळं राहायला सांगितल्याचं जॅननं म्हटलं आहे. मात्र तरीही आपल्या आईनं आपलं ऐकलं नाही आणि तिनं आपल्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. आपण कोरोना पॉझिटिव्ह असताना ती सतत आपल्यासोबत राहिल्यामुळे तिलाही कोरोनाचं इन्फेक्शन झालं, अशी माहिती त्यानं दिली आहे.  जाणीवपूर्वक झाली कोरोना पॉझिटिव्ह चेक रिपब्लिक देशातील कायद्यानुसार ज्या नागरिकांना कोरोना होऊन गेला आहे, त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होत असल्यामुळे त्यांना बहुतांश सार्वजनिक ठिकाणी प्रवेश मिळत असतो. चेक रिपब्लिककडून अशा व्यक्तींना कोरोना पास जारी केला जातो. हा पास दाखवून मॉल, थिएटर्स आणि इतर सार्वजनिक ठिकाणी जाता येतं. हा पास मिळवण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर कोरोना होऊन जावा, असं हनाला वाटत होतं. त्यामुळं तिनंही जाणीवपूर्वक स्वतःला कोरोना इन्फेक्शन करून घेतलं होतं.  हे वाचा - अचानक आला मृत्यू हनाला कोरोना इन्फेक्शन झाल्यानंतर काही दिवसांनी ती बरी होत होती. आपण आता कोरोनातून बरे झाले असून लवकरच थिएटरमध्ये प्रवेश मिळेल, असं ट्विटही तिनं केलं होतं. मात्र अचानक तिच्या पाठीत दुखू लागलं आणि ती खाली कोसळली. याच घटनेत तिचा मृत्यू झाला. अचानक तिला मृत्यूनं गाठल्यामुळे सर्वांनाच जबर धक्का बसला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus, Death, Singer

    पुढील बातम्या