मारियानं पाश्चात्य देशांमध्ये सगळ्याच वधु जसा पांढरा शुभ्र गाऊन घालतात तसाच एक सुंदर पायघोळ गाऊन परिधान केला होता. फरक फक्त इतकाच होता की या गाऊनला असणारा घुंगट तब्बल 6 हजार 962.6 मीटर म्हणजेच जवळपास 7 किलोमीटर लांब होता. एक अख्खं मैदान यानं व्यापून गेलं होतं. हा इतका प्रचंड मोठा घेर लग्नाच्या ठिकाणी आणण्यासाठी आणि तो नीट ठेवण्यासाठी 30 लोक सहा तास काम करत होते. यासाठी 34 हजार रुपये इतका खर्च करण्यात आला. मारियाचे हे लहानपणापासूनचे स्वप्न होते की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सगळ्यात लांब घुंगटची नोंद आपल्या नावावर व्हावी. अखेर तिचे हे स्वप्न सत्यात उतरले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात लांब लग्नातील वेडिंग ड्रेसचा घुंगट असण्याचा विक्रम मारिया पेरेस्केवाच्या नावावर नोंदवला गेला आहे.View this post on Instagram
कोरोना महासाथीमुळे नाही झाली तपासणी; 27 वर्षीय महिलेचा दुर्देवी अंत
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं एक एप्रिल रोजी आपल्या इन्स्टाग्राम पेजवर या लग्नाचा एक व्हिडिओ शेअर केला. ‘लग्नाचा सर्वात लांब घुंगट,जो 6962.6 मीटर होता’ अशी कॅप्शन त्याला देण्यात आली आहे. हा व्हिडिओ शेअर होताच अगदी झपाट्यानं व्हायरल झाला. अल्पावधीतच त्याला 69 हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी मारियाचे या विक्रमाबद्दल अभिनंदन केलं, तर काहींनी यामागचे कारण विचारलं. काही लोकांनी नापसंतीही दर्शवली. अशा संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असल्या तरी लहानपणापासून पाहिलेलं मारियाचे स्वप्न पूर्ण झालं याचा तिला झालेला आनंद अमूल्य असणार यात शंका नाही. तिचा विवाह सोहळा हा तिच्यासाठी आणि उपस्थितांसाठी देखील अविस्मरणीय ठरला असणार हे नक्की!मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: World record