आनंदाची बातमी! कोट्यवधी लोकांचा जीव घेणाऱ्या या रोगावर सापडलं औषध, शास्त्रज्ञांनी केला दावा

आनंदाची बातमी! कोट्यवधी लोकांचा जीव घेणाऱ्या या रोगावर सापडलं औषध, शास्त्रज्ञांनी केला दावा

एड्सवर कोणतेही लस किंवा औषध नसल्यामुळे गेल्या काही वर्षात लाखो लोकांचा जीव गेला, यात सर्वाधिक संख्या लहान मुलांची आहे. मात्र आता पहिल्यांदाच एड्स रोगावर उपचार करणारे औषध मिळाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

  • Share this:

साओ पावलो, 09 जुलै : जगभरात एड्स (AIDS) झालेल्या रुग्णांची संख्या कोट्यवधींमध्ये आहे. अद्याप एड्सवर कोणतेही लस किंवा औषध नसल्यामुळे गेल्या काही वर्षात लाखो लोकांचा जीव गेला, यात सर्वाधिक संख्या लहान मुलांची आहे. मात्र आता पहिल्यांदाच एड्स रोगावर उपचार करणारे औषध मिळाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाउलोच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, ब्राझीलचा एका एचआयव्ही (HIV) पॉझिटिव्ह व्यक्तीला औषधांचे मिश्रण देण्यात आले. या मिश्रणामुळं एड्सपासून ही व्यक्ती मुक्त झाली आहे.

संशोधकांच्या मते, एचआयव्ही ग्रस्त व्यक्तीला अनेक अँटीरेट्रोव्हायरल औषधे आणि निकोटीनामाइड औषधांचे मिश्रण दिले गेले होते. विद्यापीठानं म्हटलं आहे की गोपनीयता कायद्यामुळे रुग्णाचे नाव जाहीर करता येत नाही परंतु लवकरच जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) याबाबत माहिती देण्यात येईल.

(हे वाचा-हवेतून पसरणाऱ्या कोरोनाला घाबरायची गरज नाही, शास्त्रज्ञांनी आणला खास 'फिल्टर')

टाईम मासिकाच्या (Time Magazine) वृत्तानुसार, शास्त्रज्ञांच्या टीमने एड्स-2020 नावाच्या ऑनलाइन कॉन्फरन्समध्ये एड्स रूग्णाला बरे केल्याचा दावा करून सर्वांना चकित केले. संशोधक डॉ. रिकार्डो डियाज यांनी सांगितले की, हा ब्राझिलियन माणूस ऑक्टोबर 2012 मध्ये HIV पॉझिटिव्ह आढळला होता. रुग्णानं एड्सच्या उपचार दरम्यान देण्यात आलेली औषधं घेणं बंद केलं होतं.

(हे वाचा-कोरोनानंतर ब्यूबॉनिक प्लेगवरून चीनला पाठीशी घालतंय WHO? दिली अजब प्रतिक्रीया)

संशोधनादरम्यान, रुग्णाला दोन महिन्यांनी अँटीरेट्रोव्हायरल औषधं आणि निकोटिनामाइड औषधांचे मिश्रण दिले. एक वर्षानंतर, जेव्हा रुग्णाची रक्त तपासणी केली गेली, तेव्हा त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.

रुग्णानेही सांगितले-'मी बरा झालो'

रिकव्हरीनंतर नाव न सांगण्याच्या अटीवर, निरोगी रुग्णानं नवं आयुष्य मिळाल्याचे सांगितले. रुग्णानं सांगितले की, मी व्हायरस मुक्त झालो आहे, लाखो एचआयव्ही रुग्णांसाठी ही चांगली बाब आहे. महत्त्वाचे म्हणजे ही पहिली घटना आहे की, स्टेम सेल प्रत्यारोपणाशिवाय एचआयव्ही बरा झाला. यापूर्वी स्टेम सेल प्रत्यारोपणाने लंडनमधील एक व्यक्ती निरोगी झाला होता. संशोधक अ‍ॅडम कॅस्टालिजाच्या मते, रुग्ण जिवंत आणि व्हायरस मुक्त आहे. हे सिद्ध करते की एड्सवर उपचार केले जाऊ शकतात.

केवळ औषधांमुळे बरा झाल्याचा दावा

एखाद्या व्यक्तीला HIVची लागण झाल्यावर व्हायरसला शरीरातून बाहेर काढणं फार कठीण आहे. कारण ते रक्तपेशींमध्ये घरं बनवतात. बराच काळ शरीरात राहतात. जर रुग्णाने एकदा औषधे बंद केले तर व्हायरस सक्रिय होतो. दुसरीकडे, कॅलिफोर्निया विद्यापीठातील एड्स विशेषज्ञ डॉ. मोनिका गांधी यांच्या म्हणण्यानुसार, हे सर्व प्राथमिक स्तरावर आहे. कारण केवळ एक व्यक्ती बरा झाला आहे. याबद्दल आता अधिक संशोधन करण्याची गरज आहे.

संपादन - प्रियांका गावडे

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 9, 2020, 9:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading