Home /News /videsh /

क्रूरतेचा कळस! नशेच्या आहारी गेलेल्या आईनं 19 महिन्याच्या मुलीवर फेकलं उकळतं पाणी, मुलीचा जागीच तडफडून मृत्यू

क्रूरतेचा कळस! नशेच्या आहारी गेलेल्या आईनं 19 महिन्याच्या मुलीवर फेकलं उकळतं पाणी, मुलीचा जागीच तडफडून मृत्यू

कोकेनच्या नशेत या महिलेनं आपल्या सव्वा वर्षांच्या मुलीवर (19 Month old baby girl) उकळतं पाणी (Boiling water) टाकलं. तिला 1 तास तसंच तडफडत ठेवलं. छोट्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.

    लंडन, 17 डिसेंबर: बाळासाठी आपला जीव धोक्यात घालण्याऱ्या आईच्या अनेक बातम्या आपण वाचल्या असतील. पण आपल्याचं पोटच्या लेकरासोबतच क्रूरतेनं वागणाऱ्या आईच्या बातम्या आपण फारच कमी वेळा वाचल्या असतील. अशीच एक घटना नॉटिंघमशायर येथे घडली आहे, ज्यामध्ये कोकेनची नशा करणाऱ्या एक महिलेनं आपल्या सव्वा वर्षाच्या कोवळ्या मुलीवर उकळतं पाणी टाकलं आहे. ती एवढ्यावरचं थांबली नाही, तर उकळतं पाणी टाकल्यानंतर 1 तास तिला तसंच तडफडत ठेवलं. या घटनेत या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला असून संबंधित आरोपी महिलेला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, केटी क्रोडर नावाच्या 26 वर्षीय महिलेनं आपल्या 19 महिन्यांची मुलगी ग्रेसीवर उकळतं पाणी टाकूण तिची हत्या केली आहे. न्यायालयात सरकारी वकिलानं सांगितलं, की केटीनं जेव्हा हा गुन्हा केला, तेव्हा ती कोकेनच्या नशेत धुंद होती. तिनं केवळ मुलीवर उकळतं पाणी फेकलं नाही, तर एक तासभर तिला त्याच अवस्थेत तडफडवलं आणि तिला जीव सोडतानाही पाहिलं. नॉटिंघम क्राउन न्यायालयाने केटीला 21 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीशांनी निकाल देताना म्हटलं, की ही संपूर्ण घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. नशेच्या आहारी गेलेले पालक आपल्या मुलांसाठीच किती धोकादायक  ठरू शकतात, याचं हे उत्तम उदाहरण आहे. ग्रेसी 65% भाजली ग्रेसीच्या पोस्टमॉर्टेम अहवालानुसार, तिच्या शरीराचा 65% भाग उकळत्या पाण्यामुळं भाजला होता. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हा खूप वेदनादायक मृत्यू होता. कारण मुलगी केवळ भाजल्यामुळं मरण पावली नाही, तर तिच्या वेदनांमुळं मरण पावली. अंगावर उकळतं पाणी टाकल्यानंतर ही मुलगी तब्बल एक तास जिवंत होती. तिला वाचवलं जाऊ शकलं असतं, पण केटीनं तसं होऊ दिलं नाही. केटीच्या आई-वडिलांचं घरदेखील थोड्याच अंतरावर होतं. केटी मदतीसाठी त्यांना फोन करू शकली असती, पण तिनं तसं केलं नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, United kingdom

    पुढील बातम्या