मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

घरच्यांनी केली अंत्यसंस्काराची तयारी, पण कोरोनाला हरवत मृत्यूच्या दारातून परतला हा पठ्ठ्या

घरच्यांनी केली अंत्यसंस्काराची तयारी, पण कोरोनाला हरवत मृत्यूच्या दारातून परतला हा पठ्ठ्या

आणखी दोन दिवसांच्या औषधोपचारानंतर त्याने आपल्या आईला मेसेज पहिला मेसेज केला, “Mom, I’m alive.”

आणखी दोन दिवसांच्या औषधोपचारानंतर त्याने आपल्या आईला मेसेज पहिला मेसेज केला, “Mom, I’m alive.”

आणखी दोन दिवसांच्या औषधोपचारानंतर त्याने आपल्या आईला मेसेज पहिला मेसेज केला, “Mom, I’m alive.”

  • Published by:  Priyanka Gawde
वॉशिग्टंन 26 एप्रिल: कोरोनाच्या तडाख्यात अमेरिका होरपळत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची आणि मृत्यूची संख्याही वाढत आहे. अशी अंधारेलेली परिस्थिती असताना काही सकारात्मक गोष्टीही तिथे घडत आहेत. 29 वर्षांचा एक तरुण कोव्हिड पॉझिटिव्ह निघाला. 8 दिवस तो व्हेंटिलेटरवर होता सगळ्यांनी आशा सोडली होती. शेवटच्या निरोपाची तयारी सुरू होती. अशा परिस्थितीतून तो बाहेर आला आणि तंदुरुस्त झाला आणि त्याने प्लाझ्मा थेरेपीसाठी आपलं रक्त देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. The Washington Postने याबाबतचं वृत्त दिलं आहे. फ्रांन्सिस विल्सन असं त्या कोरोनाला हरवणाऱ्या लढवय्याचं नाव आहे. 29 वर्षांचा फ्रांन्सिस हा कायद्याचा विद्यार्थी आहे. धडधाकट असणाऱ्या फ्रांन्सिसची तब्येत अचानक बिघडली. त्याची टेस्ट केल्यानंतर तो पॉझिटिव्ह आढळला. तोपर्यंत त्याची खालावत होती . हॉस्पिटलमध्ये काही दिवसांच्या उपचारानंतर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. फ्रांन्सिसची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. व्हेंटिलेटरवर आठवडाभर ठेवल्यानंतर त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. त्याच्या रक्तातल्या ऑक्सिजनचं प्रमाण एकदम खाली गेलं होतं. डॉक्टर्स आणि नर्सेसनी त्याच्या जगण्याची आशाच सोडली होती. फ्रांन्सिसचे फक्त श्वास सुरू होते. चीनचा आणखी एक खोटारडेपणा उघड, सर्व जगाला बसला धक्का डॉक्टरांनी त्याच्या पालकांना बोलावून घेतलं आणि फ्रांन्सिस आता शेवटच्या घटका मोजत असल्याचं सांगितलं. त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. काचा आडून ते फ्रांन्सिसला बघत होते. त्याचा शेवट सुखात व्हावा म्हणून त्यांनी चर्चमधून एका फादरलाही बोलावून घेतलं होतं. शेवटची तयारी सुरू होती. आपला मुलगा गेलाच असं त्याच्या आईवडिलांनी गृहितच धरलं होतं.  शेवटी नर्सने फ्रांन्सिसच्या कानाजवळ फोन लावला. त्याची आई, वडिल, बहिण त्याच्याशी बोलले. त्याला काहीच कळत नव्हतं. काही वेळ गेल्यानंतर चमत्कार घडल्यासारखं त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली. त्या शेवटच्या क्षणांमध्ये आपल्याला अनेक स्वप्न दिसत होती. काही वेगळे असे अनुभवही आले असं फ्रांन्सिसने सांगितलं आहे. इम्रान खान यांच्या खुर्चीला धोका, पाकिस्तानात सरकार आणि लष्करामध्ये वादाची ठिणगी डॉक्टरही अचंबित झाले होते. त्यांनी लगेच औषधं बदलून दिली आणि काही तासातच फ्रांन्सिसमध्ये सुधारणा झाली. आणखी दोन दिवसांच्या औषधोपचारानंतर त्याने आपल्या आईला  पहिला मेसेज केला, “Mom, I’m alive.” फ्रांन्सिस आता ठणठणीत बरा झालाय. त्याला आणि कोरोनारुग्णांच्या प्लाझ्मा थेरेपीसाठी रक्तदानही करायचं आहे.
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या