मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Covid Vaccine: कोरोना लसीचे 20 कोटी डोस नष्ट करावे लागणार, सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांची माहिती

Covid Vaccine: कोरोना लसीचे 20 कोटी डोस नष्ट करावे लागणार, सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांची माहिती

Covid Vaccine: जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसला प्रतिबंधात्मक म्हणून तयार करण्यात आलेल्या कोविड लसींचे तब्बल 20 कोटी डोस नष्ट करावे लागण्याची शक्यता आहे.

  • Published by:  Sunil Desale

नवी दिल्ली, 24 मे : कोरोना प्रतिबंधात्मक लस (Covid Vaccine) निर्माण करणारी भारतातील कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) सीईओ अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी एक मोठं विधान केलं आहे. कोरोना लसीचे कमीत कमी 20 कोटी डोस नष्ट करावे लागतील असं अदर पुनावाला यांनी म्हटलं आहे.

अदर पुनावाला म्हटलं, बाजारात गरजेहून अधिक लसींचा पुरवठा होत आहे आणि या लसींची एक्सपायरी डेट ही ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत आहे. त्यामुळे या लसींचा वापर न झाल्यास नष्ट करणे हा एकमेव पर्याय उपलब्ध राहतो. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकोनॉमिक फोरम (WEF) च्या मार्षिक सम्मेलनात CNBC TV-18 ला दिलेल्या मुलाखतीत अदर पुनावाला यांनी हे मोठं विधान केलं आहे.

अदर पुनावाला यांनी यावेळी म्हटलं, आम्हाला आशा आहे की, जगभरातील नेते जागतिक महामारीच्या काळात कराराच्या मुद्द्यावर एकत्र येतील जे भविष्यात अशा प्रकारच्या कुठल्याही परिस्थितीत रोडमॅप तयार करण्यास मदत करेल.

वाचा : फुफ्फुसाच्या आजारांमध्ये का घातक बनतो कोरोना विषाणू; संशोधनातून आली ही बाब समोर

अदर पुनावाला पुढे म्हणाले, "या साथीच्या आजाराच्या काळात काय चूक झाली आणि काय योग्य होते हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. लसींचे वाटप, त्यासाठीच्या कच्च्या मालाचे वाटप, लसीचं प्रमाणपत्र, जगभरातील क्लिनिकल चाचण्यांमध्ये समानता आणणे, लसींचा पुरवठा अधिक आणि उपचार प्रक्रियेत काही समस्या होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारच्या गोष्टी भविष्यात होणार नाहीत अशी मी आशा व्यक्त करतो."

वाचा : लो प्रोटीन डाइटमुळे लिवरमध्ये तयार होतं खास हार्मोन, वाढतं वय दिसून येत नाही - संशोधन

हे लागू करणं म्हणजेच याची अंमलबजावणी करणं हे बंधनकारक असू शकत नाही. पण किमान ते काही प्रकारचे फ्रेमवर्क किंवा वचनबद्धता प्रदान करू शकते. जसे हवामान बदलाच्या बाबतीत दिसून येते असंही अदर पुनावाला यांनी म्हटलं आहे.

अदर पुनावाला यांनी उद्योजकांना सल्ला देताना म्हटलं, जर तुम्हाला मार्केट लीडर व्हायचे असेल तर तुमच्यासाठी जोखीम घेणे महत्त्वाचे आहे. अदर पुनावाला यांनी एक उद्योजक म्हणून शिकलेल्या धड्यांचा संदर्भ देत होते. मी शिकलोय की जर तुम्हाला मार्केट लीडर व्हायचे असेल तर तुम्हाला काही जोखीम पत्करावी लागेल.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, India, Pune