शास्त्रज्ञांना सापडले आणखी 6 CoronaVirus, असे हजारो विषाणू असण्याची वर्तवली शक्यता

शास्त्रज्ञांना सापडले आणखी 6 CoronaVirus, असे हजारो विषाणू असण्याची वर्तवली शक्यता

भारतातही 2 जातीच्या वटवाघळांमध्ये (bats) कोरोनाव्हायरस (coronavirus) सापडलेत. तर आता म्यानमारमध्येही (myanmar) शास्त्रज्ञांनी 6 नवे कोरोनाव्हायरस शोधलेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 एप्रिल : चीनमध्ये (china) उद्रेक होऊन जगभरात पसरलेला कोरोनाव्हायरस (coronavirus) माणसांमध्ये नेमका आला कुठून हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र हा व्हायरस वटवाघळा पासून (bats) आल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. भारतातही 2 जातीच्या वटवाघळांमध्ये कोरोनाव्हायरस सापडलेत. तर आता म्यानमारमध्येही शास्त्रज्ञांनी 6 नवे कोरोनाव्हायरस शोधलेत.

स्मिथसोनियन्स नेशनल झू आणि अमेरिकेतील कन्झर्व्हेशन बायोलॉजी इन्स्टिट्युटच्या शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे. जो पीएलओएस वन (PLOS One) या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. तर लाइव्ह सायन्सने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

शास्त्रज्ञांनी हा अभ्यास म्यानमारमध्ये अशा ठिकाणी केला जिथं जमिनीचा वापर वेगळ्या कारणासाठी होऊ शकतो आणि विकासामुळे मानव तिथल्या वन्यजीवांच्या संपर्कात येण्याची शक्यता अधिक आहे.

भारतीय वंशाच्या डॉक्टरांनी कोरोना रुग्णांना दिला पोटावर झोपण्याचा सल्ला आणि...

मे 2016 ते ऑगस्ट 2018 दरम्यान शास्त्रज्ञांनी वटवाघळांच्या लाळ आणि मलाचे 750 पेक्षा अधिक नमुने घेतले. त्यामध्ये माहिती असलेल्या कोरोनाव्हायरसव्यतिरिक्त आणखी 6 नवे कोरोनाव्हायरस सापडल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं. शिवाय त्यांना अशा कोरोनाव्हायरसबाबतही माहिती झाली आहे, जो दक्षिण-पूर्व आशियात इतरत्र सापडत होता मात्र म्यामानमारमध्ये याआधी कधी सापडला नव्हता.

'लॉकडाऊनमुळे आलेला स्ट्रेस दूर करण्यासाठी सेक्स करा पण...',आरोग्य विभागाचा सल्ला

या नव्या कोरोनाव्हायरसचा सार्स-कोव-1 (SARS-cov-1), मर्स (MERS) आणि आताचा सार्स-कोव-2 (SARS-cov-2) शी जवळचा संबंध नाही, असंही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे. वटवाघळांमध्ये हजारो प्रकारचे कोरोनाव्हायरस असू शकतात, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे, त्यांचा शोध अद्याप बाकी असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: April 15, 2020, 10:14 PM IST

ताज्या बातम्या