मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Covid-19 Return: 'या' शहरात कोरोना Out Of Control, आणीबाणी जाहीर

Covid-19 Return: 'या' शहरात कोरोना Out Of Control, आणीबाणी जाहीर

अमेरिकेतल्या न्यूयॉर्क राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढल्यानं चिंताही वाढली आहे.

अमेरिकेतल्या न्यूयॉर्क राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढल्यानं चिंताही वाढली आहे.

अमेरिकेतल्या न्यूयॉर्क राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढल्यानं चिंताही वाढली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

न्यूयॉर्क, 27 नोव्हेंबर: कोरोनाच्या (Corona Virus) नव्या व्हेरिएंट (variant) ओमिक्रॉननं (Omicron)जगभरात खळबळ माजली आहे. त्यातच अमेरिकेचीही चिंता वाढली आहे. अमेरिकेतल्या न्यूयॉर्क राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढल्यानं चिंताही वाढली आहे. सद्यपरिस्थिती पाहता गव्हर्नरनी 'आपत्ती आणीबाणी' जाहीर केली आहे.

संसर्गाचे प्रमाण वाढलं असून रूग्णालयात दाखल होण्याचं रूग्णांचंही प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे गव्हर्नरनी राज्यात 'आपत्ती आणीबाणी' घोषित केली. गव्हर्नरच्या आदेशाचे शीर्षक "न्यूयॉर्क राज्यातील आपत्ती आणीबाणीची घोषणा" असं आहे.

आदेशात काय लिहिलं?

या आदेशात असं लिहिण्यात आलं आहे की, "मी, कॅथी होचुल, न्यूयॉर्क राज्याचा गव्हर्नर, राज्यघटनेनं आणि न्यूयॉर्क राज्याच्या कायद्यांद्वारे मला दिलेल्या अधिकारामुळे, कलम 2-बी च्या कलम 28 नुसार कार्यकारी कायदा, मला असे आढळलं आहे की न्यूयॉर्क राज्यात एक आपत्ती आली आहे. ज्याला प्रभावित स्थानिक सरकार पुरेसा प्रतिसाद देण्यास असमर्थ आहेत आणि मी 15 जानेवारी 2022 पर्यंत संपूर्ण न्यूयॉर्क राज्यासाठी राज्य आपत्ती आणीबाणी घोषित करतो.

हेही वाचा- कृणाल पांड्याने कॅप्टनसी सोडली, भारतीय खेळाडूनं केला होता गंभीर आरोप

न्यूयॉर्कमध्ये बिघडली परिस्थिती

विशेष म्हणजे अमेरिकेतील न्यूयॉर्कला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या 24 तासात येथे 5785 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. न्यूयॉर्क राज्यात कोरोनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सुमारे 58 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 28 लाख रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये सुमारे 23.26 लाख रुग्ण बरे झाले आहेत, तर 4 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचा- घरमालकासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास पत्नीनं दिला नकार, पतीनं घेतला विचित्र निर्णय

मध्यंतरी एक काळ असा होता की, राज्यातील कोरोना व्हायरसची परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र आता पुन्हा कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणं वाढत आहेत. मोठ्या संख्येने रूग्ण रूग्णालयात दाखल होत आहेत. अशी परिस्थिती पाहता गव्हर्नर कॅथी होचुल यांनी संपूर्ण राज्यात आणीबाणी लागू केली आहे.

First published:

Tags: America, Coronavirus, Coronavirus cases