Home /News /videsh /

Online क्लास सुरू असतांनाच प्राध्यापिकेचा कोरोनाने मृत्यू, विद्यार्थ्यांना धक्का!

Online क्लास सुरू असतांनाच प्राध्यापिकेचा कोरोनाने मृत्यू, विद्यार्थ्यांना धक्का!

त्यांचा ऑनलाईन क्लास सुरू असतांनाच त्यांना श्वास घ्यायला त्रास जात होता.

    ब्युनेस आयरस 05 सप्टेंबर: कोरोनाने जगात थैमान घातलं आहे. जगातले 190 पेक्षा जास्त देश कोरोना विरुद्ध लढत असून त्यामुळे जगण्याची दिशाच बदलली आहे. अर्जेटिनामधल्या एका घटनाने सर्व देशच हादरुन गेला आहे. कोरोना असतांनाही Zoomवरून Online क्लास घेणाऱ्या एका प्राध्यापिकेचा वर्ग सुरु असतांनाच मृत्यू झाला. त्यामुळे त्या क्लासला असणाऱ्या विद्यार्थ्यांना जबर धक्का बसला आहे. पाओला डी सिमोने असं त्या प्राध्यापिकेचं नाव असून त्या 46 वर्षांच्या होत्या. पाओला या स्थानिक विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय शिकवत होत्या. 4 आठवड्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्या होम क्वारंटाईन होत्या. कोरोना असला तरी त्यांना फारसा त्रास होत नव्हता त्यामुळे त्यांनी शिकवणं सुरुच ठेवलं होतं. बुधवारी त्यांचा ऑनलाईन क्लास सुरू असतांनाच त्यांना श्वास घ्यायला त्रास जात होता. अचानक त्या खाली कोसळल्या. विद्यार्थ्यांनी त्यांना अँम्ब्युलन्ससाठी घराचा पत्ता विचारला मात्र त्यांच्या तोंडून शब्दही निघत नव्हते. हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा विद्यार्थ्यांना जबर धक्का बसला आहे. तर पाओला यांनी कोरोनाची लागण झाली असतांना शिकवायला नको होतं असं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे. या काळात आराम करायला पाहिजे होता असं सल्ला त्यांना देण्यात आला होता असंही आता सांगितलं जात आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या